एकाच सामन्यात रोहीतने मोडले विराटचे अनेक विश्वविक्रम, भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील शेवटचा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात संघाचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करताना 56 धावांची शानदार खेळी केली. या अर्धशतकासह रोहितने विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.

याशिवाय त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 150 षटकार मारण्याचा विक्रमही केला आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने अपेक्षेप्रमाणे कामगिरी करत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. जाणून घ्या या सामन्यात रोहितने कोणते रेकॉर्ड केले. यामध्ये काही असे विक्रम आहेत जे आजपर्यंत कोणत्याच खेळाडूने केलेले नाहीत.

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात ५० धावा पूर्ण करताच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिकवेळा हाफ सेंच्युरी करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने आतापर्यंत 30 सामन्यांत 50 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या आधी विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम होता. असा विक्रम करणारा रोहित जगातला पहिला खेळाडू ठरला आहे.

विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये 29 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझमने 25 सामन्यात 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे, ज्याने 22 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

रोहित शर्माने न्यूझीलंडविरुद्धच्या 56 धावांच्या खेळीत 3 षटकार ठोकले. यासह, तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 150 षटकार मारणारा जगातील दुसरा आणि भारतातील पहिला फलंदाज बनला आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिलच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार आहेत.

याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत रोहित शर्मा विराट कोहलीपेक्षा फक्त 30 धावांनी मागे आहे. रोहित शर्माच्या नावावर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3197 धावा आहेत, तर विराट कोहलीच्या नावावर 3227 धावा आहेत. या प्रकरणातही न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्टिल आघाडीवर आहे. गुप्टिलने 111 टी-20 सामन्यात 3248 धावा केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या
दीपक चाहरचा ९० मीटरचा गगनचुंबी षटकार पाहून रोहितने ठोकला सलाम, पहा व्हिडीओ
..त्यामुळे आपले पाय जमिनीवरच ठेवा, राहुल द्रविडचा भारतीय संघातील खेळाडूंना सल्ला
इशान किशनचा बुलेट थ्रो पाहून राहुल द्रविड झाला इम्प्रेस, डग आउटमध्ये केले असे काम, लोकांनी केले सलाम
गुटखा तस्करी प्रकरणात शिवसेना जिल्हाप्रमुखाचे नाव, उद्धव ठाकरेंनी ताबडतोब केली ‘ही’ कारवाई

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.