मोठी बातमी! हिटमॅन रोहीत शर्माकडे सोपवणार टिम इंडीयाच्या कर्णधार पदाची जबाबदारी

महेंद्र सिंग धोनीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विराट कोहलीला देण्यात आले आहे. मात्र भारतीय संघाचे कर्णधाप पद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसून आले आहे. अशात अनेकांनी भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माला द्यायला पाहिजे होती, असे म्हटले होते.

अशातच लवकरच भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माला सोपविण्यात येईल, असा दावा माजी सिलेक्टर किरण मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या कर्णधार पदासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माचे नाव चर्चेत आले आहे.

रोहित शर्माला लवकरच कर्णधार पदाची संधी मिळणार आहे. कोहली एक दिग्गज कर्णधार आहे. परंतु तो किती दिवस वनडे आणि टी-२० मध्ये कर्णधार पदाची जबाबदारी संभाळेल. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यावर याविषयावर चर्चा करण्यात येईल, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे.

आतंराराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणे सोपे काम नाही. भारतीय संघ वेगवेगळ्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांवर लक्ष केंद्रीत करु शकतो. तसेच रोहित शर्मा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संधी मिळायला हवी, असेही किरण मोरे यांनी म्हटले आहे.

रोहितने आधीही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातच भारतीय संघाला आशिया चषक आणि निदाहास करंडक स्पर्धांमध्ये विजय मिळाला आहे. तर भारतीय संघाने अजूनतरी विराट कोहलीच्या नेतृत्वात कुठलीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.

तसेच आयसीसी स्पर्धा असो वा आयपीएल स्पर्धा, विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाला जिंकवणे विराटला शक्य झाले नाही. विराटने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीये, तर मुंबईच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अखेर सुशांतच्या मृत्युचे सत्य आले समोर; सुशांतच्या सर्वात जवळच्या या व्यक्तीला पोलीसांनी केली अटक
सुशांत प्रकरणात आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई, सुशांतच्या जवळच्या ‘या’ व्यक्तीला अटक
बॉलीवूडमध्ये अपयश, घरच्यांनी सोडले, राज किरण यांना करावे लागले मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.