सूर्यकुमार यादवच्या या अफलातून गोष्टीवर प्रचंड इंप्रेस आहे रोहीत शर्मा

मुंबई इंडियन्सकडून या हंगामात चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचे कर्णधार रोहित शर्मा यांनी कौतुक केले आहे. आयपीएल २०२० मध्ये सूर्यकुमारने एकट्याने मुंबई इंडियन्स संघाला अनेक कठीण सामन्यांमध्ये जिंकले असून, दिल्ली संघाच्या विरूद्ध अंतिम सामन्यात अशाच खेळीची अपेक्षा टीमकडून केली जात आहे.

कर्णधार रोहितने सूर्यकुमार यादवचे कौतुक करताना म्हटले आहे की, “सूर्यकुमार त्यांच्यापैकीच आहे, ज्यांनी आपला खेळ एका वेगवेगळ्या स्तरावर नेला आहे. आपण सर्वांनी हे पाहिले आहे. आणि आपण सर्वजण त्याचे साक्षीदार झालो आहोत.”

तसेच रोहित म्हणाला “सूर्यकुमारबद्दल मला वाटणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याची बॅटिंग करण्याची पद्धत. तो फलंदाजीला उतरला तरीही तो त्याची बॅटिंग करण्याची पद्धत सांभाळतो हे आश्चर्यकारक आहे. सुर्यकुमारने आमच्यासाठी खूप चांगले काम केले आहे आणि मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे. तो इथे काहीतरी मोठे करण्यासाठी आला आहे आणि आपण ते पहात आहोत.”

इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या मोसमातील अंतिम सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यात खेळला जाणार आहे. या मोसमात मुंबई इंडियन्सकडून खेळणार्‍या सूर्यकुमार यादवने १५ सामन्यांत १४८.२३ च्या स्ट्राइक रेटने ४६१ धावा केल्या आहेत. जेव्हा मुंबई संघाला याची खूप गरज होती तेव्हा सुर्यकुमारने ही खेळी केली.

तसेच हा पहिला हंगाम नाही, जेव्हा सूर्यकुमारने इतक्या धावा केल्या, तर गेल्या दोन हंगामात त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. सुर्यकुमारने २०१९ मध्ये खेळल्या गेलेल्या १६ सामन्यात ४२४ धावा केल्या, तर २०१८ मध्ये त्याने १४ सामन्यांत ५१२ धावा केल्या.

बिहारमध्ये भाजप मोठा भाऊ! मुख्यमंत्री पदाबाबत नेत्यांकडून मोठी वक्तव्ये

गुड न्यूज! फायझरची लस ९०% प्रभावी; लवकरच विक्रीला मंजुरी?

बिहारमध्ये जंगलराज संपून मंगलराज सुरु होईल – संजय राऊत 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.