लवकरच रोहीत शर्माला टिम इंडीयाचा कॅप्टन करणार; बीसीसीआयच्या माजी सिलेक्टरचे वक्तव्य

महेंद्र सिंग धोनीनंतर भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व विराट कोहलीला देण्यात आले आहे. मात्र भारतीय संघाचे कर्णधार पद नेहमीच वादाच्या भोवऱ्यात दिसून आले आहे. अशात अनेकांनी भारतीय संघाची कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माला द्यायला पाहिजे होती, असे म्हटले होते.

अशात लवकरच भारतीय संघाची जबाबदारी रोहित शर्माला सोपविण्यात येईल, असा दावा माजी सिलेक्टर किरण मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता भारतीय संघाच्या कर्णधार पदासाठी पुन्हा एकदा रोहित शर्माचे नाव चर्चेत आले आहे.

रोहित शर्माला लवकरच कर्णधार पदाची संधी मिळणार आहे. कोहली एक दिग्गज कर्णधार आहे. परंतु तो किती दिवस वनडे आणि टी-२० मध्ये कर्णधार पदाची जबाबदारी संभाळेल. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरुन आल्यावर याविषयावर चर्चा करण्यात येईल, असे किरण मोरे यांनी म्हटले आहे.

आतंराराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणे सोपे काम नाही. भारतीय संघ वेगवेगळ्या क्रिकेट फॉरमॅटमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांवर लक्ष केंद्रीत करु शकतो. तसेच रोहित शर्मा चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला संधी मिळायला हवी, असेही किरण मोरे यांनी म्हटले आहे.

रोहितने आधीही भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी संभाळली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातच भारतीय संघाला आशिया चषक आणि निदाहास करंडक स्पर्धांमध्ये विजय मिळाला आहे. तर भारतीय संघाने अजूनतरी विराट कोहलीच्या नेतृत्वात कुठलीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही.

तसेच आयसीसी स्पर्धा असो वा आयपीएल स्पर्धा, विराट कोहलीच्या नेतृत्वात संघाला जिंकवणे विराटला शक्य झाले नाही. विराटने आतापर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाहीये, तर मुंबईच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुंबईने पाच वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकली आहे.

महत्वाच्या बातम्या-

डॉक्टर म्हणाले, दोन दिवसांपेक्षा जास्त आजी जगणार नाही, पण आजीने सर्वांना चुकीचे ठरवले
VIDEO: सेल्फीसाठी मिलिंद सोमनने महिलेला भररस्त्यात करायला लावले असे काही की, महिला झाली घामाघुम
तुमच्या लाडक्या लक्ष्याची मुलगी स्वानंदी सौंदर्यात देते मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मात; पहा तिचे सुंदर फोटो

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.