रोहित शर्मा तंदरूस्त असताना त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून का वगळले? याची सीबीआय चौकशी व्हावी

दिल्ली | टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा आयपीएल नंतर सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळणार नाही अर्थात त्याला वगळण्यात आले आहे. आणि गुढग्याच्या दुखापतीमुळे तो याआधी आयपीएलचे मागील चार सामने खेळला नव्हता.

दुखापत गंभीर असेल असे सर्वांनाच वाटत असताना मंगळवारी झालेल्या प्लेऑफच्या सामन्यात त्याला मैदानावर खेळताना बघून सर्वांना कळलं की आता रोहित शर्मा पूर्णपणे बरा झालेला आहे.

मग तरीसुद्धा त्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर का नाही पाठवणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे? सोशल मीडियावर या प्रश्नांना उधाण आले होते. चाहते या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करू लागले आहेत.

एवढच काय रोहितला स्थान मिळाले नाही म्हणून माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर, कर्नल दिलीप वेंगसरकर, माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग यांनीदेखील प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच स्वतः रोहितने हैदराबाद विरुद्धचा सामना खेळून तंदरुस्त असल्याची पावती दिली.

बीसीसीआय रोहितबाबत काहीतरी राजकारण तर करत नाहीये ना? असा गंभीर प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. काहींनी तर या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान, सौरव गांगुलीने या प्रकरणी माहिती दिली आहे की, रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा आणि इशांत शर्मा या दोन्ही खेळाडूंवर वैद्यकीय पथक लक्ष ठेऊन आहे.

जरी इशांत शर्माला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात संधी मिळाली नाही तरी तो कसोटी मालिका खेळू शकतो. रोहितला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना पाहायचं आहे. रोहित दुखापतीतून नीट झाल्यानंतर निवड समिती रोहितबद्दल नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल असं गांगुली म्हणाला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.