Rohit Sharma : टी-20 विश्वचषक 2022 सुरू होण्यास अवघे काही तास उरले आहेत. 16 ऑक्टोबर रोजी श्रीलंका आणि नामिबिया यांच्यातील सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होईल. दरम्यान, 15 ऑक्टोबर रोजी आयसीसीने ‘कॅप्टन डे’ निमित्त पत्रकार परिषद आयोजित केली होती. ज्यामध्ये सर्व संघांच्या कर्णधारांनी आपआपल्या संघाबद्दल सांगितले.
त्यापैकी एक नाव भारतीय कर्णधार रोहित शर्माचेही आहे. रोहितने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची अनुउपस्थिती आणि संघाची फलंदाजी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. त्याचवेळी हिटमॅनला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याबद्दल विचारण्यात आले.
त्याने या सामन्याबद्दल बोलण्यास नकार दिला आणि कारणही सांगितले. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी आपला पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. त्याआधी सराव सामन्यात भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडशी होणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्याबद्दल हिटमॅन म्हणाला, ‘आम्हाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचे महत्व समजते. पण प्रत्येक वेळी याबद्दल बोलून स्वतः दबाव निर्माण करण्यात अर्थ नाही. आम्ही जेव्हा जेव्हा पाकिस्तानी खेळाडूंना भेटतो तेव्हा आम्ही त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करतो.
रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला, आम्ही त्यांच्या लाईफ स्टाईलबद्दल बोलतो जसे की ते कोणती नवीन कार खरेदी करणार आहेत किंवा त्यांनी अलीकडे कोणती कार घेतली आहे. याआधीच्या जनरेशनमध्ये सुद्धा आशाच गोष्टी होत. असे आम्हाला सांगण्यात आले आहे.
त्याचे हे विधान भारतातील काही कट्टर चाहत्यांना पचनी पडणार नाही. पण रोहित शर्माने हे स्पष्ट केले आहे की, भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याचा कसलाही अतिरिक्त दबाव घेणार नाही.
महत्वाच्या बातम्या
shinde group : शिंदे गटाला आता त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेरले; मंत्री गुलाबराव पाटलांना मिळाला घरचा आहेर
raj thackeray : मनसेच्या आंदोलनाला स्टार स्पोर्टवाले घाबरले, अधिकारी पळत पळत थेट राज ठाकरेंच्या दरबारी
Shinde group : शिंदेगटा विरोधात ‘हा’ समाज मैदानात; चिन्ह रद्द करण्यासाठी ‘या’ मोठ्या व्यक्तीचे थेट पंतप्रधानांना साकडं