रोहित शर्माने एका झटक्यात मोडले विराट कोहलीचे ‘हे’ रेकॉर्ड, बनला जगातील एक नंबरचा फलंदाज

‘रोहित शर्माने’ टी-२० चे कर्णधारपद मिळताच अनेक विक्रम आपल्या नावावर केले. न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव करून रोहितने आपल्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली. राहुल द्रविडसोबतची त्याची जोडी पहिल्याच मालिकेत सुपरहिट ठरली.

रोहित शर्माला न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत ‘मॅन ऑफ द सीरीज’ म्हणूनही गौरवण्यात आले. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध इतिहास रचला आहे.

तो आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ५० हून अधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. रोहित शर्माच्या नावावर जगात सर्वाधिक अर्धशतके आहेत. ११९ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे. रोहित शर्माने २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने षटकार ठोकत आपले २६ वे अर्धशतक ठोकले.

यापूर्वी हा विक्रम विराट कोहली आणि त्याच्या नावावर संयुक्तपणे होता. बाबर आझम या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्याने २५ वेळा हा पराक्रम केला आहे. डेव्हिड वॉर्नरने २२ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

तिसऱ्या टी-२० मध्ये रोहित शर्मा ५६ धावा करून बाद झाला. त्याला ईश सोधीने बाद केले. ३१ चेंडूत खेळलेल्या या खेळीत त्याने ३ षटकार आणि ५ चौकार मारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० हून अधिक षटकार मारण्याच्या प्रकरणात रोहित शर्माने मार्टिन गुप्टिलच्या क्लबमध्ये स्थान मिळवले आहे.

गुप्टिल आणि रोहित शर्मा यांनी आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये १५० हून अधिक षटकार मारले आहेत. गुप्टिलने ११२ सामन्यात १६१ षटकार तर रोहित शर्माच्या नावावर ११९ टी-२० सामन्यात १५० षटकार आहेत. रोहितने लॉकी फर्ग्युसनच्या चेंडूवर १५० वा षटकार ठोकला.

डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजांच्या चेंडूवर सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आता पहिल्या स्थानावर आला आहे, तर न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार बनला आहे.

रोहितने जगभरातील डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांवर १८ षटकार मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एविन लुईस आहे, ज्याने डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांवर १७ षटकार ठोकले आहेत. याशिवाय त्याने कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५० षटकारही पूर्ण केले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.