रोहितने एकाच सामन्यात तोडला दोन महान खेळाडूंचा रेकॉर्ड; आफ्रिदीलाही टाकले मागे

टीम इंडियाचा टी-२० कर्णधार रोहित शर्माने शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध ३६ चेंडूत ५५ धावांची खेळी केली आणि हीखेळी खेळताना त्याने पाच षटकार ठोकले आहे. चौथ्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अॅडम मिलनेच्या गोलंदाजीवर पुल शॉट खेळून रोहितने सामन्यातील पहिला षटकार ठोकताच त्याने एका खास बाबतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीला मागे टाकले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ४५० षटकार मारणाऱ्या आफ्रिदीला रोहितने मागे टाकले. तसेच ख्रिस गेलने ४९९ सामन्यात ही कामगिरी केली होती, अशात रोहितने ४०४ सामन्यात ही कामगिरी केली. त्यामुळे त्याने ख्रिस गेललाही त्याने मागे टाले आहे. तर आफ्रिदीने ४८७ डावात हा आकडा गाठला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० पेक्षा जास्त षटकार मारणारा रोहित हा एकमेव भारतीय आहे.

एकूणच ख्रिस गेल आणि आफ्रिदी त्याच्या पुढे आहेत. गेलच्या खात्यात ५५३ आंतरराष्ट्रीय षटकार आहेत, तर आफ्रिदीच्या खात्यात एकूण ४७६ षटकार आहेत. रोहितबद्दल बोलायचे झाले तर आता त्याच्या खात्यात एकूण ४५४ आंतरराष्ट्रीय षटकारांची नोंद झाली आहे. रोहितने ४३ कसोटी सामन्यांमध्ये ६३ षटकार, २२७ एकदिवसीय सामन्यांमध्ये २४४ आणि ११८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १४७ षटकार मारले आहेत.

दुसऱ्या टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात रोहितने मिलनेच्या चेंडूवर दोन षटकार आणि मिचेल सँटनरच्या चेंडूवर तीन षटकार मारले. रोहित ज्या पद्धतीने खेळत आहे, त्यावरून असे दिसते आहे की, तो आगामी काळात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय षटकारांच्या बाबतीत आफ्रिदीलाही मागे टाकू शकतो.

टी-२० आंतरराष्ट्रीय षटकारांबद्दल बोलायचे झाले तर रोहित या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल रोहितच्या पुढे आहे. गप्टिलने १११ सामन्यात एकूण १६१ षटकार मारले आहेत, तर रोहितने ११८ सामन्यात १४७ षटकार ठोकले आहेत.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत गेल तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने १२४ षटकार मारले आहेत. जर रोहितने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात खेळून तीन षटकार मारले तर तो १५० टी-२० आंतरराष्ट्रीय षटकार मारणारा भारताचा पहिला फलंदाज ठरेल.

महत्वाच्या बातम्या-
सुनावणीदरम्यान बनियानवरच आला होता आरोपी; संतापलेल्या न्यायाधीशांनी दिली ‘ही’ भयंकर शिक्षा
‘शेतकरी अतिरेकी आहेत, तर मोदींनी त्यांच्यापुढे पांढरे निशाण का फडकवले? शेवटी अहंकार पराभूत झाला’
मोदींच्या निर्णयाला चंद्रकांत पाटलांचा विरोध, म्हणाले कृषी कायदे पुन्हा आणण्यासाठी..

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.