IND vs NZ: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा देश-विदेशात चमकत आहे. जगातील सर्वोत्तम मर्यादीत षटकांचा खेळाडू मानल्या जाणाऱ्या हिटमॅनच्या क्रेझची कल्पना करणे कठीण आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर अनेकदा असे काही कारनामे त्याच्या चाहत्यांकडून केले जात असतात.
ते कारनामे सोशल मीडियापासून ते सर्वत्र गाजले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. तेव्हा एका चाहत्याने गर्दीतून बाहेर येऊन रोहित शर्माला मिठी मारली. आता या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
सध्याच्या काळात खेळाडूंचे चाहते कोणतीही पर्वा न करता मैदानावर येतात. यानंतर खेळाडू एकतर अस्वस्थ होतात किंवा सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून कठोर कारवाईची मागणी करतात. कारण त्यांना यात धोका जाणवत असतो.
पण रायपूरमध्ये जेव्हा रोहित शर्माचा छोटा फॅन मैदानावर आला तेव्हा भारतीय कर्णधाराच्या वृत्तीने मने जिंकली. भारताच्या डावाच्या 10व्या षटकातील चौथ्या चेंडूनंतर, जेव्हा गोलंदाज त्याच्या पिचकडे परत जात होता आणि रोहितही पुढचा चेंडू खेळण्याच्या तयारीत होता.
दरम्यान, अचानक त्याचा एक छोटा निष्पाप चाहता सर्व सुरक्षा बंधने झुगारून मैदानावर आला आणि त्याने रोहित शर्माला मिठी मारली. भारतीय कर्णधारानेही मुलाला मिठी मारली, त्याचवेळी सुरक्षा रक्षकाने मुलाला मागून पकडून खेचण्याचा प्रयत्न केला.
हे घडत असल्याचे पाहून हिटमॅनने गार्डला मुलाला काहीही करू नका असे सांगितले आणि त्याला आरामात मैदानातून बाहेर जाऊ दिले. आता या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओही तुफान व्हायरल होत आहे.
येथे व्हिडिओ पहा –
Rohit Sharma doesn't have fans, he has devotees @ImRo45 ❤️
I wanted to be in the place of that boy how lucky he was 🥹#RohitSharma #INDvNZ pic.twitter.com/b96vXMMCCT— SALAAR 🏹 (@bhanurockz45) January 21, 2023
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना रायपूर येथे खेळला गेला. ज्यामध्ये भारताने 8 विकेट्सनी सहज विजय मिळवला. त्याचबरोबर या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली.
त्याचबरोबर या विजयासह टीम इंडियाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिकाही जिंकली. भारतीय क्रिकेट संघाच्या या ऐतिहासिक विजयात मोहम्मद शमी आणि रोहित शर्मा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
आजच्या सामन्यात रोहित शर्माने तुफान फलंदाजी केली. यावेळी त्याने 50 बॉल्समध्ये रन्सची खेळी केली. यामध्ये कर्णधाराने 7 फोर आणि 2 सिक्सेसचा समावेश आहे. तर शुभमन गिलने 53 बॉल्समध्ये 40 रन्सची खेळी केली. रोहित शर्माची विकेट गेल्यानंतर विराट कोहली देखील मैदानात उतरला होता. मात्र अवघ्या 11 रन्सवर त्याला माघारी परतावं लागलं.
टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहे. तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट काढण्यात यश आलं आहे.
महत्वाच्या बातम्या
कौटुंबिक अडचण सांगत सोडली मॅच अन् नंतर दिसला रोहीत पवारांसोबत; केदार जाधवच्या लबाडीचा कळस
एसटी महामंडळाच्या गाडीवर देवी-देवतांचे स्टिकर, नावं लावण्यास बंदी; शिंदे फडणवीस सरकारचे आदेश
पृथ्वी शॉचे गाऱ्हाणे साईबाबाने ऐकले, दिले श्रद्धा अन् सबुरीचे फळ! ३ वर्षांनी टिम इंडीयात निवड