‘रोहित सरदाना मनोरूग्ण खोटारडा होता, तो पत्रकार म्हणून कुणाच्याही आठवणीत राहणार नाही’

कोरोनामुळे देशात दिवसेंदिवस मृत्यूचा आकडा वाढत चालला आहे. काल आज तक या वृत्तवाहिनीचे वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचे देखील कोरोनामुळे निधन झाले आहे. रोहित सरदाना यांच्या जाण्याने अनेकांना एकच धक्का बसला.

त्याच्या जाण्याने अनेकजण दुःख व्यक्त करत असताना मात्र शरजील उस्मानीने रोहित सरदाना यांच्या मृत्युची बातमी समजल्यावर त्याने वादग्रस्त ट्विट केले आहे. या ट्विटमुळे आता नवीन वादाला सुरुवात झाली आहे.

या ट्विटमध्ये रोहित सरदाना समाजविरोधी, मनोरुग्ण खोटारडा, नसंहाराचे समर्थन करणारा होता. तो पत्रकार म्हणून आठवणीत राहणार नाही, असे शरजील उस्मानीने ट्विट करून म्हटले आहे. यामुळे आता एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

त्यांची तब्येत स्थिर असताना सकाळी ४ वाजता अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले होते. मात्र त्यांचे हृदयविकाराचा झटका आल्याने दु:खद निधन झाले.

रोहित सरदाना यांच्यावर उपचार चालु होते तेव्हाही ते इतरांना मदत करत होते. त्यांनी याबाबत ट्वीट देखील केले होते. त्यांच्यावर दिल्लीतूल मेट्रो रूग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाशी दोन हात करताना देखील ते लोकांची मदत करत होते.

त्यांच्या जाण्याची बातमी लगेच संपूर्ण देशभरात पसरली. अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांचा कोरोना काळातला विडिओ व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्या

विद्या बालनने बेडरुमधील सिक्रेट सांगून सर्वांना दिला आश्चर्याचा धक्का, म्हणाली नवऱ्यासोबत प्रणय करताना मला..

सलाम! पत्नीचे दागिने विकून रिक्षालाच बनवलं अ‍ॅम्बुलन्स; गोरगरीबांना देतोय मोफत सेवा

कोरोनावरून सरकारवर टीका करणाऱ्या लोकांवर कारवाई केली तर…; सुप्रीम कोर्टाने केंद्राला ठणकावले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.