Share

शरद पवारांचे ‘हे’ दोन नातू निवडणूकीत एकमेकांना भिडले; अखेर रोहीत पवारांचा झाला विजय

rohit

क्रिकेट पासुन दुर राहिलेले शरद पवार नातवांमधील लढत थांबवण्यासाठी अखेर मैदानात उतरले. आपल्याच दोन नातवांमधील म्हणजेच रोहित पवार आणि अभिषेक बोके यांच्यात लढत झाली. हीच लढत थांबवण्यासाठी शरद पवार यांना रविवारी मैदानात उतरावे लागले.

फार प्रयत्नानंतरही त्यांच्या दोन्ही नातवांमध्ये रंगत लढत झाली. या निवडणुकीत रोहित पवार यांचा विजय झाला तसेच संघटनेचे अध्यक्षपद देखील त्यांनाच मिळाले.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर एमसीएची निवडणूक रविवारी पार पडली. निवडणूक जाहीर झाल्यापासून कोण बाजी मारेल याची चर्चा सुरूच होती. जे.एस. सहारिया यांच्या देखरेखीखाली निवडणूक जाहीर झाली होती. सहारिया यांनी महाराष्ट्र मुख्य सचिव आणि निवडणूक आयोगाचे प्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

या निवडणुकीत संलग्न क्लबमधून आमदार रोहित पवार आणि अभिषेक बोके यांनी अर्ज दाखल केले होते. यांच्यासोबतच माजी क्रिकेटपटू शंतनू सुगवेकर आणि सुनील संपतलाल मुथा यांनीदेखील अर्ज दाखल केले होते. रोहित पवार हे शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत तर अभिषेक बोके हे पवारांच्या बहिणीचा नातू.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अजित पवार यांच्याकडे सर्व मंडळी गेले होते. मागच्या आठवड्यात या निवडणूक संदर्भातच सुमारे ४० लोकांची बैठक घेतली होती. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी या बैठकीतून अनेक प्रयत्न करण्यात आले जेणेकरून काही तोडगा निघेल. यात अतुल जैन आणि शंतनू सुगवेकर यांना पदधिकारी करण्याचा विचार मतदारांनी व्यक्त केला होता.

रोहित पवार ही संघटना हातात घेण्यासाठी जास्त आग्रही होते. अजित पवारांनी घेतलेल्या बैठकीमुळे सूत्रे हलले. यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या सगळ्यांत लक्ष घातले. आणि अभिषेक बोके यांना माघार घेण्याचा आदेश दिला गेला. जैन आणि सुगवेकर यांनी रोहित पवार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी अनुकूल असा प्रतिसाद दिला नव्हता.

रविवारी सकाळी मतदान पार पडले. रोहित पवार आणि मुथा यांना क्लब वर्गातून सर्वात जास्त मते मिळवून विजयी झाले. पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील ही लढत असल्यामुळे तणाव पूर्वक वातावरण होते. एकूण २४ मतदारांपैकी पवार यांना २२, तर मुथा यांना २१ मते मिळाली.

ताज्या बातम्या
sharad pawar : ‘या’ कारणामुळे मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत; शरद पवारांनी भाजपवर फोडले खापर
अरे झाकणझुल्या आता दिवसाही गांजा ओढायला सुरुवात केलीस का? अजित पवार – भाजप वाद चिघळला
Chandrakant Patil : अजित पवार अन् मुख्यमंत्री…; चंद्रकांत पाटलांनी उडवली रोहित पवारांची खिल्ली

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now