जामखेडच्या सभापतीपदासाठी पुन्हा रोहित पवार विरुद्ध राम शिंदे!

अहमदनगर । जामखेड पंचायत समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीमुळे जामखेड मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये जामखेडच्या आजी-माजी उपसभापतींची या जागेसाठी चुरस पहायला मिळणार आहे.

आमदार रोहित पवार व माजी मंत्री राम शिंदे यांच्या समर्थकांमध्ये ही लढत होणार आहे. त्यामुळे पवार विरूद्ध शिंदे यांच्यातच अप्रत्यक्ष झुंज होणार असल्याची चर्चा पंचक्रोशीत आहे.

विद्यमान उपसभापती मनिषा सुरवसे विरूद्ध माजी उपसभापती राजश्री मोरे अशी लढत पहायला मिळणार आहे. सुरवसे यांचे पती रवी सुरवसे हे शिंदे यांचे समर्थक तर मोरे यांचे पती सूर्यकांत मोरे हे रोहित पवार यांचे खंदे समर्थक आहेत.

शिंदे यांचे प्राबल्य असलेल्या जामखेडच्या जागेला रोहित पवार यांचे आता चांगलच तगडे आव्हान उभे ठाकले आहे. आता या चुरशीत नक्की बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.