“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”

मुंबई | मोदी सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाचे आता राज्यात देखील राजकीय वर्तुळात याचे पडसाद उमटू लागले आहे. केंद्र सरकारने तयार केलेल्या या शेतकरी कायद्यांना राष्ट्रवादीने देखील कडाडून विरोध दर्शविला आहे.

अशातच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कॉन्ट्रॅक फार्मिंगचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. याचाच धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत,’ असे निलेश राणे यांनी म्हटले आहे.

हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे…
आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या कॉन्ट्रॅक फार्मिंगचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी म्हंटले आहे की, ‘शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्या राजकारणी मंडळींच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या कंपन्यांचे बॅनर पाहून आनंद झाला. हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे,’ अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर …’
“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”
अजित पवार गरजले; ‘माझ्या बारामतीत सावकारी चालणार नाही, अन्यथा…’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.