नकलीपणाच्या ‘त्या’ आरोपावर रोहित पवारांचे निलेश राणेंना जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची कृषी कायद्यांविषयीची भूमिका दुटप्पी आणि नकलीपणाची असल्याचा आरोप भाजप नेते निलेश राणे यांनी केला होता.

‘नकलीपणा काय असतो बघायचं असेल तर हे वाचा. जे रोहित पवार शेतकरी कायद्यांचा संदर्भ देऊन शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याच रोहित पवारांची स्वतःची कंपनी शेतकऱ्यांना करार करण्याचे फायदे सांगत आहेत,’ असे निलेश राणे यांनी केले होते.

याचाच धागा पकडत आता निलेश यांच्या टीकेला रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘बातमीची शहानिशा न करता मला नकली म्हणणाऱ्यांनी कोकणातल्या निळ्याशार समुद्राकडून पारदर्शकता आणि निखळता हा गुण घेण्याची गरज आहे. केवळ क्षणिक प्रसिद्धीसाठी घरी बसून दुसऱ्याची मापं काढत बसलात तर लोकं कायमस्वरूपीच घरी बसवतील,’ असे रोहित पवारांनी म्हंटले आहे.

तसेच ते फेसबुक पोस्टमध्ये पुढे म्हणतात, ‘कृषी कायद्यांना शेतकऱ्यांचा असलेला विरोध आणि या पार्श्वभूमीवर होत असलेले शेतकरी आंदोलन हा खूप महत्वपूर्ण विषय आहे. यासंदर्भात, मी ४ डिसेंबर २०२० रोजी लिहिलेल्या पोस्टचा आधार घेऊन काही न्यूज पोर्टलने मी दुटप्पीपणा करत असल्याचा आरोप केलाय. पण हा आरोप अर्धवट माहितीवर एकांगी पद्धतीने करण्यात आल्याचे दिसतंय.

दरम्यान, ‘मी यापूर्वीही लिहिलेल्या पोस्ट मध्ये करार शेतीवर लिहीताना म्हटले होतं की, ‘कंत्राटी शेतीही काळानुसार निश्चित आली पाहिजे. कंत्राटी शेती आली तर शेतकऱ्याला बांधावरच माल विकता येईल. शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढून विकासाला गती येईल, या सर्व गोष्टी निश्चितच चांगल्या आहेत; परंतु करार करणारी कंपनी आणि शेतकरी यांच्यात वाद उद्भवला तर सामान्य शेतकरी मोठ्या कार्पोरेट कंपन्यासोबत कायदेशीर लढाई लढू शकेल का? असे रोहित पवार यांनी म्हंटले.

महत्त्वाच्या बातम्या
शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल; ‘राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, पण….’
“रोहित पवारांचा नकलीपणा बघायचा असेल तर हे नक्की वाचा”
‘ओबीसी समाजात कुणी घुसण्याचा प्रयत्न करत असेल, तर …’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.