Rohit Pawar: नवी मुंबईतील (Navi Mumbai) सिडकोच्या (SIDCO) ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) चे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या प्रकरणावर खुलासा करत शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) स्थापन केलेल्या उच्चाधिकार समितीने या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिवांना (Chief Secretary Maharashtra Government) पत्र पाठवले आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सोशल मिडियावरून उच्चाधिकार समितीचे पत्र शेअर करत शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्यावर प्रश्न उपस्थित केला. त्यांनी लिहिले, “आता दाढ दुखणं थांबलं असेल तर भ्रष्टाचाराबाबत पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार का?” यामुळे या प्रकरणावर सरकारी प्रतिक्रिया अपेक्षित आहे.
सिडकोच्या (SIDCO) अध्यक्ष असताना शिरसाठ (Sanjay Shirsat) यांच्यावर रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सातत्याने ५ हजार कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचे आरोप केले आहेत. सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन उच्चाधिकार समितीने (High-Power Committee) प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने चौकशीला गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले की, “गॅंग्स ऑफ गद्दारच्या #सिडको जमीन घोटाळ्याच्या १२००० पानांच्या पुराव्यांनंतरही झोपलेल्या सरकारला जाग आली नाही, परंतु सर्वोच्च न्यायालयाद्वारे स्थापन समितीने प्रकरण गंभीरतेने घेतले. वन विभागाची सरकारी जमीन असताना बिवलकर (Biwalkar) यांना बेकायदेशीर भरपाई देण्यात आली, याबाबत चौकशीसाठी मुख्य सचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे.”
रोहित पवार (Rohit Pawar) यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक, राजकीय संघटना आणि स्थानिक नागरिकांच्या प्रयत्नांमुळे प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले आहे. “दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं. काहीही झालं तरी या दलालांना आम्ही सोडणार नाही आणि अजीर्ण होईपर्यंत खाल्लेलं पचवू देणार नाही,” असे त्यांनी म्हटले.





