एमपीएससी परीक्षा झालीच पाहीजे; दोन्ही काँग्रेसचे युवा नेते राज्य सरकार विरोधात उभे

पुणे | महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं १४ मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० पुढे ढकलल्याने राज्यभरात विद्यार्थी संतप्त झाल्याचे दिसत आहेत. अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि काँग्रेसचे युवा नेते सत्यजित तांबे यांनी राज्य सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

याबाबत आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणतात, “यापुढं कोरोनामुळं कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढं जावं लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच एमपीएससीची परीक्षा झाली पाहिजे”.

तसेच ट्विटमध्ये रोहित पवार यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे. रोहित पवारांच्या या विनंतीची राज्य सरकार कशी दखल घेतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

याशिवाय, काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत तांबे यांनी देखील राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. एमपीएससीची परीक्षा अचानकपणे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्याचा निषेध करतो. असं सत्यजीत तांबे यांनी म्हटले आहे. अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे. असा सवाल तांबे यांनी केला आहे. त्या निर्णयावर तातडीने फेरविचार करा असं आवाहन तांबे यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात ठिकठिकाणी स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. सरकारने आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी गोपीचंद पडळकर रस्त्यावर; पुण्यात ठिय्या आंदोलन
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा पुण्यात रास्ता रोको, परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी आक्रमक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.