Share

Rohit Pawar on Mahadev Munde Murder Case: महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन् वाल्मिक कराडच्या टेबलवर… रोहीत पवारांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Mahadev Munde Murder Case: बीड (Beed City) जिल्ह्यातील महादेव मुंडे (Mahadev Munde) हत्याकांडाने पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. जमिनीच्या वादातून झालेल्या या निर्घृण खुनाबाबत धक्कादायक तपशील समोर आले आहेत. आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं की, 12 गुंठे जमिनीसाठी हा खून घडवून आणण्यात आला. ती जमीन वाल्मिक कराड (Walmik Karad) यांच्या मुलाच्या ताब्यात घ्यायची होती. कराडचे दोन मुलगे आणि गोट्या गित्ते यांनी मिळून महादेव मुंडेंचा अत्यंत क्रूरपणे खून केला.

पोस्टमार्टेम अहवालानुसार, महादेव मुंडेंच्या गळ्याजवळील मांसाचा तुकडा कापून काढण्यात आला होता. कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी उघड केले की हा मांसाचा तुकडा थेट वाल्मिक कराड यांच्या टेबलावर ठेवण्यात आला. हा थरारक तपशील मुंडे कुटुंबानेच रोहित पवारांना सांगितला.

 रोहित पवारांचा आरोप

पवार म्हणाले की, या प्रकरणाबाबत मी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला. मात्र, एफआयआरमध्ये अनेक महत्वाची नावं घेण्यात आलेली नाहीत. सुप्रिया सुळे (Supriya Sule) या घटनेची माहिती घेत आहेत, तर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही अधिवेशनात याचा पाठपुरावा केला आहे. पुरावे असूनही आरोपी अद्याप अटकेत नाहीत, ही गंभीर बाब आहे.

कुटुंबाने सीडीआर काढण्यासाठी स्वतःचा खर्च केला. सरकारने हा खर्च करायला हवा होता, पण सतीश फड यांनी बहिणीसाठी न्याय मिळावा म्हणून दीड लाख रुपये खर्च करून हा डाटा मिळवला. बाळा बांगर यांनी दाखवलेले फोटो पाहून स्पष्ट होते की, महादेव मुंडेंचा अत्यंत निर्दयीपणे खून झाला आहे.

एसआयटीमध्ये संतोष साबळेंची नेमणूक करा 

या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीमध्ये पीआय संतोष साबळे (Santosh Sable) यांना घ्यावं, अशी मागणी पवारांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आयजींशी बोलणी केली असून, पुढील पाठपुरावा रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले.

ज्ञानेश्वरी मुंडे (Gnyaneshwari Munde) यांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटू दिले जात नसल्याबाबतही पवारांनी नाराजी व्यक्त केली. तीनही मोठ्या नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कुटुंबाचं म्हणणं ऐकावं, अशी विनंती त्यांनी केली.

आरोपींचं रक्षण होतंय?

या हत्याकांडात स्थानिकांचा संशय आहे की, काही ठराविक लोक प्रशासनाच्या आडोशाला आरोपींचं रक्षण करत आहेत. कुटुंब दोन वर्षांपासून न्याय मागत आहे. त्यांनी पोलिस ठाण्यात अनेक वेळा धाव घेतली, आत्मदहनाचाही प्रयत्न केला, पण तरीही न्याय मिळालेला नाही.

पवारांनी इशारा दिला की, वाल्मिक कराड आणि त्याच्या ओळखीचे लोक चुकीच्या कामात आहेत, गांजा-ड्रग्ज विकणारे लोक त्यांच्याशी जोडलेले आहेत. ते कुटुंबाला इजा पोहोचवू शकतात, त्यामुळे सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना पोलिस संरक्षण मिळायला हवे.

कराडची 1000 कोटींची मालमत्ता जप्त करा

पवारांनी मागणी केली की, वाल्मिक कराडची तब्बल 1000 कोटींची प्रॉपर्टी जप्त करावी. एवढी संपत्ती कुठून आली, याची चौकशी व्हावी. तसेच या संपत्तीत कोणाची भागीदारी आहे हेही जनतेसमोर यावे. कराड आणि त्याच्या कुटुंबातील जे कोणी या गुन्ह्यात जबाबदार असतील, त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now