पिंपरीतील अन्वीला रोहित पवारांचा मदतीचा हात; उपचाराचा निधी उभारण्यासाठी लोकांना केली विनंती

पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या आरती सुरज वाव्हळ यांना एक १५ महिन्यांची मुलगी आहे. या मुलीचे नाव अन्वी असून तिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा आनुवांशिक दुर्मिळ आजार आहे. या आजाराच्या उपाचारासाठी तिला १८ कोटी रुपयांची गरज आहे.

सुरज वाव्हळ हे सामान्य कुटुंबातील आहे, त्यामुळे त्यांच्याकडून उपचारासाठी इतकी मोठी रक्कम उभी करणे शक्य नाही. त्यामुळे कुटुंब लोकांना मदतीचे आवाहन करत आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी अन्वीच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट शेअर करत लोकांना निधी उभारण्यासाठी मदतीचे आवाहन केले आहे.

फेसबुक पोस्ट-
पिंपरीतील सौ. आरती वाव्हळ यांची मुलगी अन्वी हिला स्पायनल मस्कुलर अट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला असून त्यावरील उपचारासाठी १६ ते १८ कोटी ₹ एवढा अवाढव्य खर्च अपेक्षित आहे. या आजारावरील औषधं परदेशातून आणावी लागत असल्याने त्यावर टॅक्सही कोट्यवधी रुपयांचा भरावा लागतो.

औषधांचा आणि टॅक्सचा हा प्रचंड खर्च कोणत्याही सामान्य माणसाला परवडू शकत नाही. त्यामुळं टॅक्स माफ करण्यात यावा आणि या औषधांबाबत धोरणात्मक निर्णय घेऊन सरकारने आणि लोकांनीही उपचारासाठी मदत करावी, ही विनंती!
———
आपली मदत पुढील अकाऊंटवर पाठवता येईल.
For more information : http://anvifightssma.com/
Suraj Wavhal (Anvi’s Father)
Gpay/PhonePay/Paytm 9766188989
Bank Account Details
Name : Anvi Suraj Wavhal
Account #: 50100440238877
IFSC Code : HDFC0001795
Branch : HDFC Chinchwad

 

महत्वाच्या बातम्या-

आता राज्यात किराणा दुकानातही मिळणार वाईन, शरद पवारांची ईच्छा उद्धव ठाकरे करणार पूर्ण
लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय मुलाने केला ३५ वर्षीय महिलेवर बलात्कार, पैसेही उकळले
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींची मदत जाहीर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.