राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घातला धिंगाणा; रोहित पवारांवर अर्ध्यातून कार्यक्रम सोडण्याची नामुष्की

जळगाव | राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांच्या जळगाव येथील कार्यक्रमात तुफान गोंधळ झाला आहे. तेथील कार्यक्रमाचे आयोजन फसल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांना आवरता आयोजकांच्या नाकी नऊ आले. यावेळी परिस्थिती पाहता रोहित पवार यांनीही कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

रविवारी रोहित पवार हे जळगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यक्रमासाठी गेले होते. त्याठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे आयोजन दुपारी साडेतीन वाजता करण्यात आले होते. मात्र रोहित पवार यांना त्यांच्या इतर ठिकाणच्या कार्यक्रमांमुळे येण्यास तब्बल तीन तास उशीर झाला. ते सायंकाळी सहा वाजता जळगावातील पक्ष कार्यालयात कार्यक्रमास आले.

यावेळी रोहित पवार याच्यांसोबत सेल्फी घेण्यासाठी तसेच त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. कार्यकर्त्यांचा बेशिस्तपणा पाहून वरिष्ठ नेते आणि आयोजकांनी त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणाताही कार्यकर्ता ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.

दरम्यान, ही सर्व परिस्थिती रोहित पवार यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच माइकचा ताबा घेतला आणि पाच मिनिटात आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी, गोंधळ आणि धक्काबुक्की केल्याने रोहित पवार यांनी कार्यक्रम आटोपता घेतल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाच्या ठिकाणची एकूण परिस्थिती पाहून रोहित पवार यांनी डोक्याला होत लावला. तेथून बाहेर पडत असताना त्यांना कार्यकर्त्यांच्या गर्दीचा, घोषणाबाजी आणि रेटारेटीचा सामना कारावा लागला. काही कार्यकर्त्यांनी साखळी करत त्यांना त्यांच्या वाहनाजवळ आणले.

महत्वाच्या बातम्या-
अजित पवार गरजले; ‘माझ्या बारामतीत सावकारी चालणार नाही, अन्यथा…’
….म्हणून पुनावाला यांनी सांगूनही शरद पवारांनी स्वतःला लस टोचवून घेण्यास दिला नकार
नामांतरापेक्षा शहरांचा विकास महत्वाचा; राऊतांच्या ‘रोखठोक’ला राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर
“शेतकरी कायद्यांना विरोध करणाऱ्यांनो… हा दुटप्पीपणा किळसवाणा आहे”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.