“महायुतीत असताना बाळासाहेब भाजपसाठी हिंदूहृदयसम्राट होते आणि आता…”

देशभरात कोरोनाच्या संकटाने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यसरकार केंद्राकडून मदत मागत आहे. अशात या कोरोनाच्या संकटातही सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात वादविवाद सुरु असल्याचे दिसून येत आहे.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यात ट्विटरवर वॉर सुरु आहे. या पार्श्वभुमीवर रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे. युतीत असताना भाजपसाठी बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदय सम्राट होते, आता भाजपसाठी ते फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडिल आहे, अशी टिका रोहित पवार यांनी केली आहे.

युतीत असताना स्व. बाळासाहेब ठाकरे तुमच्यासाठी हिंदुहृदयसम्राट होते, आता ते फक्त उद्धवजींचे वडील? भावना आणि भूमिका सत्तेच्या पलीकडील असतात, असं ऐकलं होतं. परंतु आपल्या भावना सत्ता जाताच बदलल्या. अशी सोयीस्कर भूमिका बदलावी तर तुम्हीच, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

तसेच संसद निश्चित महत्वाची आहे पण आज लोकांचा जीव महत्त्वाचा असल्याने सगळे स्रोत आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकडं वळवणं गरजेचं असतांना कोरोनाच्या संकटातही कामगारांना ओढून आणून संसदेचं काम पूर्ण करण्याचा अट्टहास कशासाठी?, असेही रोहित पवार यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने यंदा आपले हक्काचे जीएसटीचे २०८३३ कोटी रुपये बुडवले. २४ ते ३० एप्रिलसाठी ४.३४ लाख रेमडेसिवीर इंजेक्शन देण्याची घोषणा करूनही राज्याला कालपर्यंत केवळ २.२४लाख इंजेक्शन्स मिळाले. महाराष्ट्राची कोंडी होत असताना आपण मात्र मौन बाळगता! आपला मराठी बाणा दिल्लीसमोर झुकला की काय?, असाही टोला रोहित पवार यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, नवे संसद महत्वाचे आहे, की देशातील नागरीकांचे लसीकरण, असा सवाल रोहित पवार यांनी याआधी उपस्थित केला होता. त्यानंतर मुख्यंमंत्री ४०० कोटी खर्च करुन आपल्या वडिलांचे स्मारक उभारत आहे, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले होते. आता त्यांच्याच ट्विटला रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

सोलापुरच्या त्या दीड कोटीच्या मोदी बकऱ्याचा मृत्यू; मालकाने स्वत:च्या मुलासारखा केला होता सांभाळ
‘मी देशसेवा केली, पण सिस्टीम माझ्या मुलाला वाचवू शकली नाही’, जवानाचा आक्रोश
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी हे आयुर्वेदीक औषध ठरतंय रामबाण उपाय; आयुष मंत्रालयाचा दावा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.