रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, फेसबुक लाईव्ह करत केले आरोप

बारामती । राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मालकीच्या बारामती ॲग्रो या कंपनीवर एका शेतकऱ्याने गंभीर आरोप केले आहेत. यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपासून कोरोना आणि बर्ड फ्लूचा मोठा फैलाव झाला होता. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते होते.

यामुळे कोंबड्यांच्या आणि अंड्यांच्या किंमती देखील कमी झाल्या होत्या. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात सध्या कोंंबड्यांच्या अंड्यांचे उत्पादन कमी झाल्याचे चित्र आहे. यावर पुरंदर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं थेट फेसबुक लाईव्ह करत बारामती ॲग्रोवर गंभीर आरोप केले आहेत.

या शेतकऱ्याने सांगितले की, बारामती ॲग्रो कंपनीचे उत्पादन खराब झाल्याने आणि कंपनीने विक्रीपुर्वी क्वालिटी चेक न केल्याने पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसला आहे, असा आरोप योगेश चौरे यांनी केला आहे.

अनेक शेतकऱ्यांनी बारामती ॲग्रोचे कंपनीचे फीड खरेदी केले होते. असे असताना हे फीड कोंबड्यांना दिल्यानंतर कोंबड्यांनी अंडी देणे बंद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. महिन्याला या शेतकऱ्यांना ३ लाखाचे नुकसान होत आहे.

फेसबुक लाईव्ह करत या शेतकऱ्याने हे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत डाॅक्टरांनी आरएनडी करायला सांगितले. खराब वातावरण असल्याने कोंबड्या अंडी देत नाहीत. असे क्षुल्लक कारण कंपनीचे डाॅक्टर देत आहेत, असाही आरोप या शेतकऱ्याने केला आहे.

कोंबड्यांना महिन्याला ८० हजारांचे खाद्य लागते. अंडी मिळत नसतील तर खाद्य कुठून आणायचे असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. आमदार रोहित पवार आणि कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही ते म्हणाले.

रोहित पवार गारपीट झाली तर शेतकऱ्यांच्या बांधावर जातात. तर मग आमच्याकडे का येत नाहीत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. आमच्याशी चर्चा करून आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील या शेतकऱ्याने केली आहे. यामुळे आता हे प्रकरण तापले आहे.

ताज्या बातम्या

त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, एकदम 70mm.. केदार शिंदेंची खास पोस्ट व्हायरल

अमिताभ बच्चनने दुसऱ्यांदा राजकारणात यायला दिला नकार; चिडलेल्या राजीव गांधीने राजेश खन्नाला बनवले स्टार

कोरोनाची लस घेणाऱ्यांसाठी खास ऑफर; देत आहेत, कार, सोने आणि आयफोन

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.