झोमॅटो(Zomato) या लोकप्रिय फूड डिलिव्हरी अँपने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. एप्रिलपासून झोमॅटो अँपवर ऑर्डर दिल्यानंतर दहा मिनिटांत ग्राहकांना डिलिव्हरी दिली जाणार आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(NCP) आमदार रोहित पवार यांनी झोमॅटो कंपनीवर निशाणा साधला आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीच्या या धोरणावर टीका केली आहे.(rohit pawar angry on zomato new decision)
आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, “डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.”
झोमॅटो कंपनीचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल यांनी ट्विट करत कंपनीच्या नवीन सेवेची माहिती दिली होती. आता फूड ऑर्डर १० मिनिटांत मिळणार आहे. झोमॅटोच्या या नवीन योजनेची सुरवात गुरुग्राममधून एप्रिलपासून पासुन करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल यांनी दिली होती.
डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. १० मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 22, 2022
यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी झोमॅटो कंपनीवर टीका केली आहे. हा निर्णय म्हणजे डिलिव्हरी बॉयच्या जीवाशी खेळ आहे, असे आमदार रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले होते. डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेच्या संदर्भात झोमॅटो कंपनीचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
झोमॅटो कंपनीचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल यांनी सांगितले की, “लवकर डिलिव्हरी देण्यासाठी आम्ही डिलिव्हरी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही. डिलिव्हरी द्यायला उशीर झाला तरीही आम्ही कोणताही दंड त्यांच्याकडून आकारणार नाही. वेळेची घाई असली, तरी त्याच्यासाठी कोणचा देखील जीव धोक्यात घातला जाणार नाही”, असे दीपिंदर गोयल यांनी सांगितले आहे.
ज्या ठिकाणी जास्त मागणी आहे, त्याच ठिकाणी १० मिनिटांत डिलिव्हरी सेवा राबविली जाणार आहे. सुरवातीला ही सेवा गुरग्राम शहरात राबविली जाणार आहे. त्यानंतर देशातील इतर ठिकाणी ही सेवा सुरु करण्यात येणार आहे. कोणत्या पदार्थाना जास्त मागणी आहे, याचा अंदाज घेऊनच ही सेवा सुरु ठेवली जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :-
विधानसभा निवडणूकीत दमदार कामगिरी अन् आमदाराला लागली राज्यसभेची लॉटरी; बनणार सर्वात तरुण सदस्य
‘या’ महिला क्रिकेटरने मध्यरात्री जडेजासाठी केले होते १२ ट्विट; म्हणाली, ‘उद्या सकाळी पुलमध्ये भेटू’
लवकरच ‘या’ स्टॉकची किंमत होणार झिरो, तुमच्याकडेही असेल तर नाही मिळणार एक पैसा