आजोबांच्या पावलावर नातवाचे पाऊल; शिवजयंतीच्या कार्यक्रमात रोहित पवारांनी भर पावसात केले भाषण

मुंबई | राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अहमदनगरमध्ये भर पावसात भाषण केले. उपस्थितांनी देखील पावसात उभं राहून हे भाषण ऐकले. रोहित पवार यांनी केलेल्या या भाषणामुळे उपस्थितांना शरद पवार यांनी साताऱ्यातील सभेमध्ये केलेल्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण झाली.

शिवजयंतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी रोहित पवार जामखेडमध्ये आले होते. त्यांनी भाषणाला सुरुवात केली आणि कार्यक्रमादरम्यान अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. मात्र, अशाही परिस्थितीतही रोहित पवार यांनी आपलं भाषण बंद न करता उपस्थितांशी संवाद सुरूच ठेवला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘शिवजयंतीनिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आज येथे काही तरुणांनी मर्दाने खेळांचे प्रात्यक्षिक दाखवले. आज करण्यासारखे खूप होते. मात्र अचानक पाऊस आला. त्यामुळे कार्यक्रम आटोपता घेण्यात आला. मी आयोजकांना एवढेच सांगतो की, पाऊस आला असला तरी तुमचे प्रयत्न हे महत्त्वाचे होते. उद्देश महत्त्वाचा होता. दिवस चांगला होता.

दरम्यान, दीड वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी साताऱ्यामध्ये भर पावसात केलेले भाषण महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अविस्मरणीय ठरले होते. सभेमुळे निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी वातावरणनिर्मिती झाली होती.

महत्त्वाच्या बातम्या
शिवजयंतीदिनी छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायल्याने पुण्यात शाहीराला अटक
चित्रपटातील अभिनेत्यानेच केली रोहित शेट्टीच्या चित्रपटातील ‘त्या’ स्टंटची पोलखोल, पहा व्हिडीओ
ऐश्वर्याने कुटूंबाच्या विरोधात जाऊन दिले होते किसींग सीन्स; मिळाली होती नोटीस

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.