रोहीत पवार म्हणताहेत दाऊदला पकडून आणा, अजितदादा म्हणतात कशाचा दाऊद दाऊद करता

पुणे । भारतात घडवून आणलेल्या अनेक दहशतवादी कारवायांचा प्रमुख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पाकिस्तानमध्ये नसल्याचे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आले. यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया येत आहेत.

यावर पुण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. दाऊदबाबत पाकिस्तानने केलेल्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, अरे कशाचा दाऊद, दाऊद करत बसलास!

दाऊदबाबत काहीतरी कोणीतरी टीव्हीला दाखवत होते. आपल्याकडील वातावरण खराब करण्याचे काम त्या टोळीने केले आहे. यावर केंद्र आणि संबंधित अधिकारी चर्चा करतील आणि त्याला आणण्याचा निर्णय घेतील.

यावर निर्णय घेण्यात ते सक्षम असून आम्ही त्यावर वक्तव्य करणे बरोबर नाही. याअगोदर मोदीजी काहीपण करा पण दाऊदला भारतात घेऊन या असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.