भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये झाला. या सामन्यात भारताने न्युझीलंडचा आठ गडी राखून पराभव केला.
दुसरी वनडे जिंकून टीम इंडिया मालिकेत 2-0 ने पुढे आहे. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तसेच, त्याने मागील सामन्याच्या तुलनेत प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही.
गेल्या वेळी भारतीय संघाची गोलंदाजी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही. दरम्यान, रोहितकडून मॅचविनर खेळाडूकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. पण रोहित शर्माने सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या दिग्गज खेळाडूचा समावेश प्लेईंग ११ मध्ये केला नाही.
रोहित शर्माने दुसऱ्या सामन्यात त्याची प्लेइंग इलेव्हन उघड करताच टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकचे नाव त्यात समाविष्ट करण्यात आले नव्हते. तर उमरान उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. उमरान मलिकने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ३ बळी घेतले होते. यानंतर दुसऱ्या सामन्यात त्याने 2 बळी घेतले.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने उत्कृष्ट खेळाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. असे असूनही, हिटमॅनने त्याचा प्लेइंग-11 मध्ये समावेश केला नाही. या मालिकेत त्याने केवळ प्रेक्षक म्हणून राहता कामा नये, अशीच चाहत्यांची इच्छा आहे.
त्याचा वेग हेच उमरान मलिकचे बलस्थान आहे. ज्याच्या जोरावर तो फलंदाजाचे डोळ्याची पापणी पडायच्या आत चेंडू फेकत विकेट मिळवते. आयपीएलमध्ये गोलंदाजीचा वेग दाखवून त्याने टीम इंडियात स्थान निर्माण केले आहे.
उमरानने भारताकडून 7 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. असे असूनही कर्णधार रोहित शर्मा त्याला संधी देत नाही. वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळण्याची संधी दिली जात नसताना तो गोलंदाजीत कसा परिपक्व होईल?
दुसऱ्या सामन्यात या खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली: भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज मोहम्मद शमी.
महत्वाच्या बातम्या
जम्मूची स्पीडगन! उमरान मलिकने टाकला भारताचा आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू, स्पीड होता तब्बल..
चहलच्या या कृत्यावर संतापला उमरान मलिक; LIVE मॅचमध्ये करोडो प्रेक्षकांसमोर केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल