Share

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation : अजितदादांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला; खडसेंचा हल्लाबोल

Rohini Khadse on Suraj Chavan Resignation :  राजकारणात काही वेळा मोठ्यांना वाचवण्यासाठी लहान माणसाला बळी द्यावा लागतो म्हणतात, पण यातून सामान्य जनतेच्या भावनांचा खेळ होतो, हे कुणीच का समजत नाही? असंच काहीसं चित्र सध्या राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतंय. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या सूरज चव्हाण (Suraj Chavan) याने ‘छावा’ कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी राजीनामा दिला, पण माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर मात्र अजून कारवाई झाली नाही, यामुळे रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी थेट अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.

लातूरमध्ये घडलेल्या या घटनेचा पाया होता, माणिकराव कोकाटे यांच्या मोबाईलवर खेळल्या जाणाऱ्या रम्मीचा व्हिडीओ, जो रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्सवर टाकला होता. यामुळे छावा संघटनेच्या (Chhava Sanghatana) कार्यकर्त्यांनी लातूरमध्ये सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर पत्ते उधळून निषेध व्यक्त केला. या निषेधानंतर सूरज चव्हाणने कार्यकर्त्यांवर हात उगारला, आणि त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला.

या प्रकरणावर दबाव वाढल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाणचा राजीनामा घेतला, ही बाब रोहिणी खडसे यांनी जरी स्वागतार्ह मानली तरी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की, “दुधाची भूक ताकावर भागवू नये.” म्हणजे लहान माशाला गळाला लावून मोठ्या माशाला पाण्यात सोडण्याचा प्रकार करू नका.

त्यांनी अजित पवार यांना स्पष्ट मागणी केली. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहात शेतकऱ्यांचा आणि लोकशाही प्रक्रियेचा अपमान केला आहे, त्यांचाही राजीनामा घ्यायला हवा. केवळ सूरज चव्हाणवरच कारवाई करून तुम्ही जबाबदारी झटकू शकत नाही, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

या सर्व प्रकारावर शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते योगेश केदार (Yogesh Kedar) यांनीही सूरज चव्हाणला फेसबुक पोस्टच्या माध्यमातून इशारा दिला. त्यांनी म्हटलं “सुरुवातीला मारहाण करायची, आणि नंतर दिलगिरी व्यक्त करून सगळं विसरून जायचं, ही प्रवृत्ती अयोग्य आहे. जर आज सूरज चव्हाणला थांबवलं नाही, तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्यांवर हात उगारेल.”

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now