Share

Devendra Fadnavis : “मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप तरी कशी लागते ओ?”; रोहिणी खडसे भडकल्या

Devendra Fadnavis : बीड(beed) जिल्ह्यातील गुन्हेगारीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख(Santosh Deshmukh,) यांच्या निर्घृण हत्येनंतर जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत, *डीजेच्या आवाजाने त्रस्त झालेल्या एका महिला वकिलावर गावच्या सरपंचाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण* केल्याचा प्रकार अंबाजोगाई तालुक्यात घडला आहे.

आवाजाच्या त्रासाविरोधात तक्रार; परिणामी मारहाण

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वकील मायग्रेनच्या त्रासाने पीडित होती. घरासमोरील *लाऊड स्पीकर आणि पीठाची गिरणी* हटवावी, अशी तक्रार तिने स्थानिक प्रशासनाकडे केली होती. या तक्रारीमुळे संतप्त झालेल्या *सरपंच व त्यांच्या समर्थकांनी महिलेला शेतात घेरून लाठ्या-काठ्यांनी आणि लोखंडी पाईपने अमानुष मारहाण केली*.

या घटनेत महिला वकील गंभीर जखमी झाली असून, तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर सध्या ती घरी परतली असली तरी मानसिक आणि शारीरिक आघातामुळे ती खूपच व्यथित आहे. या मारहाणीचे *फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल* होत आहेत.

रोहिणी खडसेंचा(Rohini Khadse) सरकारवर थेट सवाल

या घटनेवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा *अ‍ॅड. रोहिणी खडसे(Rohini Khadse) यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. त्यांनी *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना उद्देशून विचारले*, “मुख्यमंत्री महोदय, हे फोटो बघा आणि सांगा तुम्हाला झोप कशी लागते?”

तसेच, त्यांनी पुढे म्हटले की,
“जर एक वकील महिला सुरक्षित नाही, तर महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलेला नाही. या घटनेमुळे राज्याची अवस्था बिहारपेक्षाही वाईट झाली आहे.”
कायद्याचा धाक कुठे? ही घटना उघडकीस आल्यानंतर बीडमधील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. एका सामान्य नागरिकाने आवाजाच्या त्रासाविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याला याचा एवढा भयावह परिणाम भोगावा लागतो, हे चित्र *लोकशाहीतील गंभीर अपयश* दर्शवते.

*सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे*. आरोपी सरपंच व संबंधित कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र या घटनेनंतर, बीड जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
rohini-khadse-gets-angry-and-lashes-out-at-devendra-fadnavis

ताज्या बातम्या क्राईम राजकारण

Join WhatsApp

Join Now