मित्राने सांगीतले राॅकेल पिल्यावर कोरोना जातो, मित्राचे ऐकले व गमावला जीव; मृत्यूनंतर रिपोर्ट निगेटीव्ह आला

देशभरात कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पण एका व्यक्तीचे कोरोनाच्या भीतीने भीतीने रॉकेल पिल्यामुळे मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब अशी की त्या व्यक्तीच्या मृत्यू नंतर कोरोना रिपोर्ट काढण्यात आला तर तो निगेटिव्ह आला आहे.

या व्यक्तीला आधी ताप आला होता. कोरोनाच्या भीतीने त्याने त्याच्या मित्राला सल्ला विचारला. त्याचा मित्राने रॉकेल पी असा सल्ला दिला. त्याने रॉकेल पिल्यानंतर कोरोना मरतो असा सल्ला दिला.

त्याने रॉकेल पिल्यानंतर त्याची तब्येत बिघडली. तब्येत बिघडल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युनंतर त्याची कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली.

सदर घटना भोपाळमध्ये घडली आहे. भोपाळ मधील अशोका गार्डन मधील महिंद्रा नावाच्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी ताप आला होता. त्या व्यक्तीने त्याच्या मित्राला काय करावे असे विचारले तर त्याने कोरोनावर उपाय म्हणून रॉकेल पी असा सल्ला दिला.

मित्राने दिलेला अजब-गजब सल्ला मानून त्याने रॉकेल पिले. रॉकेल पिल्यामुळे त्याची तब्येत बिघडत गेली. तब्येत बिघडल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण तिथे दाखल करून न घेतल्याने त्याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली.

दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर महेंद्रला डॉक्टरांनी मृत घोषित केले. महेंद्रला कोरोना होतो का नाही हे तपासण्यासाठी डॉक्टरांनी त्याची मृत्यूनंतर कोरोना चाचणी केली तर ती कोरोना चाचणी निगेटिव्ह आली.

ताज्या बातम्या
कलेक्टरने सोनू सूदच्या मदतीचा दावा फेटाळला, सोनूने थेट पुरावाच दाखवला

थॉमस एडिसनच्या आईने ‘ते’ पत्र लपवून नसते ठेवले तर जगाला महान संशोधक भेटला नसता

गुड न्युज! पेट्रोल डिझेल टाकल्यावर मिळणार तब्बल १५० रुपयांची सूट; ‘असा’ मिळवा फायदा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.