हा घाट दरवर्षी घेतो २०० ते ३०० लोकांचा जीव; या घाटाचा विचार करुनही अनेकांचा उडतो थरकाप

जगभरात अअनेक भितीदायक ठिकाणे आहे, ज्या ठिकाणी जाऊन माणसाचे परत येणे अशक्यच वाटते. जगभरात असेही रस्ते आणि घाट आहेत, जिथे गाडी चालवण्यासाठी चांगले चांगले ड्रायव्हर घाबरत असतात.

अनेक मोठ्या मोठ्या डोंगरांमध्ये खतरनाक घाट तयार केले जातात. साध्या सरस्त्यांवर गाडी चालवणे सोपे असते, पण आज आम्ही तुम्हाला अशा एका घाटाबद्दल सांगणार आहोत, जिथे गाडी चालवण्याचा विचार केला तरी लोकांचा थरकाप उडतो.

या घाटाचे नाव आहे द रोड ऑफ डेथ. हा घाट बोलिवियाच्या युंगास प्रांतात आहे. या घाटाला बघूनच अनेकांच्या भुवया उंचावतात. या घाटावर गाडी चालवणे म्हणजे मृत्युला सामोरे जाण्यासारखेच आहे.

जगातील सर्वात खतरनाक रस्ता समजल्या जाणाऱ्या या रस्त्याची लांबी ६४ किलोमीटर आहे. हा रस्ता खडतर असण्यासोबतच निसटा पण आहे. त्यामुळे अनेक गाड्यांचे टायर स्लिप होऊन त्या गाड्या थेट दरीत कोसळतात.

हा रस्ता सिंगल लेनचा आहे. हा रस्ता इतका बारीक आहे, की एकाच वेळी दोन गाड्या या रस्त्यावरुन जाऊ शकत नाही. अनेकदा तर गाडी या रसस्तावरुन जात असताना एक टायर रस्त्याचे खाली जाते. अशावेळी नीट काळजी घेऊन गाडी चालवावी लागते.

अनेकदा टायर सटकल्यामुळे गाडी थेट दरीत जाऊन पडते. अशाप्रकारे आतापर्यंत अनेक अपघात झाले आहे. दरवर्षी या घाटावर २०० ते ३०० लोकांचा जीव जातो. ही दरी १५ हजार ४०० फुट इतकी खोल आहे.

महत्वाच्या बातम्या-

गेल्या सहा वर्षांपासून घराबाहेर नाही पडली ही महीला; कारण ऐकून धक्का बसेल
‘या’ प्रगत युरोपीय देशात जमिनीखाली पुरतात अंडरवेअर; कारण वाचून चकीत व्हाल
आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, केंद्र सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलीय; न्यायालयाने झापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.