रस्ता वाहून गेला तरीही फडणवीस बांधावरुन चिखल तुडवत शेतकऱ्याच्या भेटीला..

बारामती । मागील आठवड्यात राज्यात जोरदार वाऱ्यासह पाउस पडला. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामध्ये उस्मानाबाद, सोलापुर, पुणे, लातुर, या जिल्हांमध्ये मोठे नुकसान झाले.

यामुळे आता राजकीय नेते या शेतकऱ्यांची भेट घेत आहेत. आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावात भेट दिली. मात्र गावाचा प्रमुख रस्ता पावसामुळे वाहून गेला होता.

यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीला रस्ता नव्हता. मात्र तरीदेखील त्यांनी भेटीसाठी वाट पाहत बसलेल्या ग्रामस्थांशी ओढा ओलांडून त्यांच्यापर्यंत पोहचून संवाद साधला. चिखल तुडवत ते शेतात गेले.

फडणवीस यांनी आधी अलिकडे थांबून गावकऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केेला. मात्र आवाज पोहचत नव्हता म्हणून शेवटी त्यांनी ओढ्यातून पलिकडे जाण्याचा निर्णय धेतला. आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रवीण दरेकर, वासुदेव काळे, राहूल कुल देखील उपस्थित होते.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार हे देखील सोलापूर दौऱ्यावर आहेत. नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी ते गेले आहेत. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.