पावसामुळे रोड खचला आणि संपूर्ण ट्रक खड्ड्यात गेला, पाहा विडिओ

नवी दिल्ली । संपूर्ण देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. असे असताना गेल्या ४ दिवसांपूर्वी देशात तौक्ते चक्रीवादळाचे संकट आले. याचा फटका राजधानी दिल्लीलाही बसला आहे. बुधवारपासून दिल्लीत पाऊस पडत असल्याने दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या ४५ वर्षातील विक्रमी पावसाची नोंद झाली आहे.

यामुळे याचा फटका अनेकांना बसत आहे. रस्ते जलमय झाले आहेत. अशातच रस्ता खचून एक ट्रक जमिनीत गेल्याचा विडिओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून अंगावर काटा येत आहे. हा ट्रक दिल्लीच्या नजफगढ भागात जात असताना रस्ता खचलेल्या एका मोठ्या खड्ड्यात गेला. यामुळे सर्वांनी तेथे धाव घेतली.

काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दिल्लीत रस्ते खराब झाले आहेत. नजफगढ परिसरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही ठिकाणचा भरावही वाहून गेला आहे. यामुळे हा रस्त्याने जाणारा ट्रक खड्ड्यात गेला.

तेथील लोकांनी ट्रकचा ड्रायव्हर आणि अजून एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. दिल्लीत सध्या भूमिगत मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे काही घरांना तडे गेले आहेत. नजफगढमध्ये पावसाळ्यात जमीन खचण्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत.

बुधवारीही रात्री जोरदार पाऊस झाल्याने रस्त्याच्या कडेचा भाग खचला. यामुळे ही घटना घडली. ते असलेलता मेट्रोच्या कामगारांनी हा रस्ता वाहनांसाठी धोकादायक असल्याचे सांगितले होते. आणि या ट्रकचालकास थांबण्यास सांगितले होते.

मात्र, ट्रक चालकाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे पुढील घटना घडली. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. ट्रकमधील दोघांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र या पावसामुळे दिल्लीत मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीसह अनेक राज्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे.

ताज्या बातम्या

गुजरातमध्ये कर्मचारी ८ महिन्यात फक्त १६ दिवस कामावर हजर; गैरहजेरीचे सांगितले विचित्र कारण

सोलापूरच्या भांगे कुटुंबियांचा नादच नाय! तीन गुंठ्यांत ७५ प्रकारची पिके, कमावतात हजारो

द वॉल राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा नवीन कोच, बीसीसीआयकडून माहिती  

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.