काठी टेकत राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला आलेले हे आजोबा नक्की कोण?

मुंबई | मंगळवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूडही शोकाकुल झाले. अभिनेते राजीव कपूर यांच्या अंत्यदर्शनाला अनेक बडे लोक आले होते. मात्र त्यातही या वयोवृद्ध गृहस्थांनी लोकांचं लक्ष वेधून घेतले.

कंबरेत वाकलेले हे गृहस्थ आहेत तरी कोण हे कुतूहल सगळ्यांनाच वाटत होते. या वयात अंत्यदर्शनाला आलेल्या या गृहस्थांचं नाव आहे विश्व मेहरा असे आहे. विश्व मेहरा आणि कपूर कुटुंबीय यांचे ऋणानुबंध खूप जुने आहेत. एवढच नाही तर आवारा, जब जब फूल खिले आणि प्रेम ग्रंथ या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे.

याचबरोबर विश्व मेहरा हे आर. के. स्टुडिओचे कधीकाळी मॅनेजर होते. तसेच ते नात्याने राज कपूर, शम्मी कपूर, शशी कपूर यांचे मामा आहेत. म्हणून आजही बॉलिवूडमध्ये अनेक जण आजही त्यांना मामा म्हणून ओळखतात. विश्व मेहरा यांनी कपूर कुटुंबाच्या तीन पिढ्यांसोबत काम केलेले आहे.

दरम्यान, विश्व मेहरा यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी विश्व मेहरा यांचा हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘अख्ख्या पृथ्वीवर माझ्यासारखी दुसरी अभिनेत्री कोणच नाही, म्हणून मी एवढी अहंकारी आहे’
कंगनाला उपरती! खारमधील राहत्या फ्लॅटबाबत कंगनाकडून याचिका मागे…
रोड रोमिओंची आता गय नाही! स्त्रियांकडे एकटक पाहणं म्हणजे विनयभंग; सत्र न्यायालय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.