बिहारचा ‘बाहुबली’ कोण? ‘आरजेडी’ने घेतली मुसंडी, एनडीए आणि महाआघाडीत ‘कांटे की टक्कर’

मुंबई | बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात काय चित्र स्पष्ट होणार हे अद्याप समजू शकलेलं नाही. आता जे कल हाती येत आहेत त्यावरुन महाआघाडी आणि एनडीए यांच्यात चुरशीची लढाई दिसून येते आहे. बिहारची निवडणूक एनडीए आणि महाआघाडी प्रतिष्ठेची केली आहे.

याचबरोबर सायं ६ पर्यंत एनडीएने १२१ जागांवर आघाडी घेतली होती. तर महागठबंधन ११४ जागांपर्यंत पोहोचली होती. मात्र आता हे चित्र थोडे वेगळे समोर येत आहे. नवीन कलांनुसार तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वातील आरजेडीने भाजपला मागे टाकले आहे.

भाजपला ओव्हरटेक करत आरजेडीने ७५ जागांवर आघाडी घेत मोठा पक्ष म्हणून उभारी घेतली आहे. तर दुसरीकडे भाजप ७३ जागांसह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. याचबरोबर बिहारमध्ये उशिरा रात्रीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

दरम्यान, साडेसहा वाजेपर्यंत ३ कोटीहून अधिक मतमोजणी झाली आहे. अजूनी १ कोटीहून अधिक मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे बहुमत कोणत्या पक्षाला मिळेल हे अजूनही सांगता येणं कठीण आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या
कॉग्रेसला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या संजय राऊतांना कॉंग्रेस नेत्यानेच फटकारले..
टफ फाइट! ‘आरजेडी’नं भाजपला ओव्हरटेक करत घेतली मुसंडी
तेजस्वी यादव यांची मेहनत तरूण राजकारण्यांसाठी खूप प्रेरणादायी – शरद पवार

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.