बिहारमध्ये भाजप-जेडीयूला सत्तेवर बसवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निकाल बदलले?

मुंबई | राष्ट्रीय जनता दलाने आरोप केला आहे की, मतमोजणी सुरू असताना निकालामध्ये घोळ घालण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्री नितीशकुमार आणि सुशीलकुमार मोदी हे अधिकाऱ्यांवर दबाव टाकत आहेत असा गंभीर आरोप राष्ट्रीय जनता दलाने केला आहे.

तसेच मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा गंभीर आरोप राजदकडून करण्यात आला आहे. नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेवर दबाव टाकत असल्याचंही त्यांनी म्हटले आहे. याबाबत थेट राजदच्या ट्विटर हँडलवरुन निवडणूक आयोगाने दिलेली यादी ट्वीट करण्यात आली आहे.

तसेच मतमोजणी पूर्ण झालेल्या ११९ जागांचे निकाल हाती आले आहेत. ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार जिंकले आहेत तिथे त्यांना विजयाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. मात्र आता त्यांना सांगण्यात येते आहे की तुम्ही हरले आहात आणि विजयी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, ‘नितीश कुमार, सुशील मोदी मुख्यमंत्री निवासस्थानात बसून सर्व जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणत आहेत. महागठबंधनला कोणत्याही परिस्थितीत १०५-११० जागांवर रोखण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीत जनमताची लूट होऊ देणार नाही,’ असे राजदने म्हटले आहे.

दरम्यान, राजद नेते मनोज झा म्हणाले, ‘निकाल बदलले जात आहेत. महाराजगंज, त्रिवेणीगंज, कटिहार यासारख्या अनेक जागांवर प्रमाणपत्रं दिली जात नाहीएत. मतमोजणी लांबवण्यासाठी चालढकल सुरू आहे,’ असा आरोप झा यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या
बिहारचा ‘बाहुबली’ पुन्हा नितीशराज! भाजपा प्रणित एनडीएला मिळालं स्पष्ट बहुमत
देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला – शरद पवार
कॉग्रेसला उपदेशाचे डोस पाजणाऱ्या संजय राऊतांना कॉंग्रेस नेत्यानेच फटकारले..

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.