..त्यानंतर सुशांत ड्रग्सच्या पूर्ण आहारी गेला व त्याला त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले होते

मुंबई | सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्स कनेक्शन सापडल्यानंतर रियाला आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला NCB ने अटक केली आहे. NCB च्या चौकशीत रियाने पुन्हा एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने ८ जून रोजी सुशांतचे घर सोडण्याचे कारण सांगितले आहे.

आज तकने दिलेल्या रिपोर्टनुसार रियाने NCB ला सांगितले आहे की, सुशांत ड्रग्सच्या आहारी गेला होता आणि त्याला त्यातून बाहेर पडणे अशक्य झाले होते. म्हणून तिने सुशांतचे घर सोडले होते. लॉकडाऊन आणि मिटूचे सुशांतवर लागलेले आरोप लक्षात घेता आपले करिअर खराब होईल असे तिला वाटत होते.

रियाने पुढे सांगितले की, केदारनाथच्या शूटिंगनंतर त्याने आपला ड्रग्सचा डोस वाढवला. तो केदारनाथच्या शूटिंगच्या आधीपासून ड्रग्स घेत होता पण जास्त घेत नव्हता फार मर्यादित ड्रग्स घेत होता.

सुशांत जेव्हा बॉलीवूडमध्ये आला तेव्हा त्याचे सर्कल सुपर पार्टी कल्चर बनू लागले. जिथे तो ड्रग्स घ्यायचा पण ड्रग्सच्या आहारी गेला नव्हता. रियाने सांगितले की, सुशांत क्यूरेटेड मर‍िजुआनाचे १० ते २० डोस घ्यायचा आणि तो एक प्रकारे त्यावर अवलंबून होता.

NCB चे सहसंचालक राकेश म्हणाले आहेत की, ड्रग्स रॅकेटशी रियाचे जवळचे संबंध आहेत आणि आम्ही त्याच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकरणामुळे एक मोठे ड्रग्स रॅकेट उघडकीस आले आहे ज्याचे दुबई आणि दहशतवादी गटांशी आंतरराष्ट्रीय संबंध आहेत, असे ते एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले आहेत.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.