२०१५ बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची बहीण रिया यांनीही मिळवले मोठे यश, दोन्ही बहिणी देशसेवेत

नवी दिल्ली । देशात नुकताच UPSC परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अनेकांनी मोठे यश मिळवले आहे. यामध्ये ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यामध्ये बिहारचा शुभम कुमार भारतातून पहिला आला आहे.

या परीक्षेत २०१५ बॅचच्या IAS टॉपर टीना डाबी यांची छोटी बहीण रिया डाबी यांनी देखील मोठे यश मिळवले आहे. यामुळे त्यांचे देखील कौतुक केले जात आहे. रिया डाबी यांनी या परीक्षेत देशातून १५ वा रँक मिळवला आहे. त्यांनी यासाठी मोठी तयारी देखील केली होती.

IAS टीना डाबी यांनी आपल्या सोशल मीडियावर बहीणीच्या यशाबद्दल माहिती दिली. सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच बिहारच्या शुभम कुमारने भारतातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. तर, जागृती अवस्थी आणि अंकिता जैन अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या आल्या आहेत.

नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी लोकसेवा परीक्षा २०२० मध्ये एकूण ७६१ उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. बिहारच्या शुभम कुमारने देशातून पहिला येण्याचा मान मिळवला आहे. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यावर असताना देखील त्यांचे फोन करून अभिनंदन केले आहे.

मुंबईमध्ये त्याने शिक्षण घेतले आहे, बीटेकमध्ये पदवी घेतलेल्या शुभमने तिसऱ्या प्रयत्नात अव्वल क्रमांक मिळवला. याआधी त्याने दोनदा परीक्षा दिली होती. त्याचे वय अवघे २४ आहे. शुभम सध्या इंडियन डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसमध्ये प्रशिक्षण घेत आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. अनेक विद्यार्थ्यांनी गरिबीत शिक्षण घेऊन हे यश मिळवले आहे. यामुळे त्यांच्या कुटूंबीयांच्या चेहेऱ्यावरचा आनंद गगनाला मावत नव्हता. यासाठी अनेक वर्षे अनेकांनी मोठा संघर्ष केला आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.