सुशांत प्रकरणातील आदित्य ठाकरेंच्या भूमिकेबद्दल रियाने सोडले मौन; म्हणाली..

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर या प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे, असा आरोप अनेक राजकीय नेत्यांनी केला आहे.

तसेच, सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरेंचे नावदेखील घेतले जात होते. त्यानंतर आदित्य ठाकरे या प्रकरणावर बोलताना म्हणाले की, या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सुशांतची प्रियसी रिया चक्रवर्ती हीची देखील कसून चौकशी करण्यात येत आहे. आदित्य ठाकरेंनी स्पष्टीकरण दिल्यानंतर, आता रियानंदेखील माध्यमांसाठी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे.

या निवेदनात तिने असे सांगितले की, आदित्य ठाकरे कोण आहेत? मी त्यांना कधी भेटलेही नाही. रियाने त्यांच्यासोबत फोनवरून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून कधीही संवाद साधलेला नाही. असे स्पष्टीकरण रियाच्या वतीने माने शिंदेंनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात आहे.

पुढे त्या निवेदनात असेही सांगण्यात आले आहे की, एकाच क्षेत्रात काम करत असल्याने सुशांत आणि रिया एकमेकांना काही वर्षांपासून ओळखत होते. त्यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध होते.

दरम्यान, एप्रिल २०१९ मध्ये सुशांत एका पार्टीला गेला होता. त्यानंतर रिया आणि सुशांतने एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. एकमेकांच्या घरात बरेच दिवस सोबत राहिल्यानंतर दोघेही वांद्र्यातल्या माऊंट ब्लँकमध्ये राहायला गेले.

८ जून २०२० पर्यंत रिया तिथे राहत होती, असा तपशील निवेदनात आहे. त्यानंतर सुशांतची बहिण प्रियांकाने त्रास दिल्याचा आरोपदेखील रियाने केला आहे. हे निवेदन रियाचे वकील माने शिंदेंनी प्रसिद्ध केले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.