सुशांतच्या मृत्यूनंतर रिया बेकायदेशीरपणे गेली होती शवगृहात; कुणी केली यासाठी मदत? वाचा..

 

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा १४ जूनला वांद्रेच्या राहत्या घरी मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात त्याने आत्महत्या केल्याची म्हटले जात आहे, मात्र त्याने आत्महत्या का केली? हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. तसेच या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहे, आता एका न्यूज पोर्टल अभिनेत्री रिया चक्रवर्तीबद्दल एक मोठा दावा केला आहे.

एका न्यूज पोर्टलने असे म्हटले आहे की, सुशांतच्या मृत्यूनंतर जिथे सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता त्याठिकाणी रिया गेली होती. पोर्टलच्या या दाव्यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.

सुशांतचे शवविच्छेदन कूपर रुग्णालयात झाले होते. त्यानंतर रिया त्याच रुग्णालयात गेली होती. ती तिथे जवळपास ४५ मिनिटे थांबली होती, असे न्यूज पोर्टलने केलेल्या दाव्यात म्हटले आहे.

तसेच रिया चक्रवर्ती त्या शवगृहात सुशांतचा मृतदेह असताना गेली कशी? शवगृहात जाण्यासाठी तिला परवानगी मिळाली कशी? ही परवानगी दिली कोणी? असेही प्रश्न आता निर्माण झाले आहे.

दरम्यान, रियाने शवगृहात बेकायदेशीर रित्या प्रवेश केला होता, असे शवगृहातील अधिकाऱ्याने म्हटले आहे. तसेच तिला हा प्रवेश देण्यासाठी मुंबई पोलिसांनी मदत केली होती, असे म्हटले जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.