अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला जवळपास सात महिने झाले आहे. आता रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत आली आहे. एका खासगी पार्टीतही ती उपस्थित होती. रोडीज फेम राजीव लक्ष्मण याच्या सोबतचा रिया चक्रवर्ती हिचा एक फोटो व्हायरल झाला.
रियाची नुकतीच १ महिन्यांनंतर जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. त्यानंतर रिया कुठेच दिसली नव्हती. काही दिवसांपूर्वी रिया तिच्या भावाबरोबर घर शोधताना दिसली होती. त्यानंतर रिया राजीवसोबत एका पार्टीत दिसली.
राजीव लक्ष्मणने मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत रिया देखील एन्जॉय करताना दिसत आहे. या फोटोवरुन सुशांतच्या चाहत्यांच्या उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत.
रिया व राजीवचा पार्टीतला हा फोटो व्हायरल होताच, सुशांतचे चाहते भडकले. राजीवने रिया सोबतचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर लगेच त्याने ते फोटो डिलीट केले. याशिवाय त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली. नवीन पोस्टमध्ये त्याने कमेंट्सचे ऑप्शन डिसेबल केले आहे.
रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे. २०२१ मध्ये रियाचा ‘चेहरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत दिसणार आहेत.
‘डोनाल्ड ट्रम्प यांना स्वतःला रिपब्लिकन म्हणवून घेण्याचा अधिकार राहिला नाही’
भंडारा : …तर दुर्घटना घडली नसती; RTIच्या अहवालातून धक्कादायक माहिती आली समोर
…नाहीतर ८ फेब्रुवारीपासून तुमचे व्हॉट्सअप अकाऊंट आपोआप बंद होणार; व्हॉट्सअपची नवी पॉलिसी