सुशांत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. रिया २८ दिवस मुंबईच्या भायखळा जेलमध्ये होती. या प्रकरणात रियाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वीच रियाची सुप्रीम कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे.
तुरुंगातून बाहेर आल्यावर रियाने तिच्यावर खोटे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. रियाच्या वकीलांनी रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना चेतावणी दिली होती.
त्यानंतर रियाने तिची शेजारीन डिंपल थवानी विरोधात खोट्या अफवा पसरवल्याबद्दल एफआयआर दाखल केली होती. डिंपलने दावा केला होती की, सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस अगोदर म्हणजे १३ जुनला सुशांत रियाला सोडण्यासाठी घरी आला होता.
पण एनसीबीच्या चौकशीत डिंपल आपल्या दाव्यावरुन पलटली. त्यानंतर रियाने डिंपल विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिंपलनंतर आत्ता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेचा नंबर आहे. असे बोलले जात आहे.
सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, ‘सुशांत आत्महत्या करणारा व्यक्ती नाही. मी रियाच्या जागी असते तर सुशांतला एवढे टोकाचे पाऊल उचलू दिले नसते’. अंकिताच्या या विधानानंतर सोशल मीडियावर अनेक वाद निर्माण झाले होते.
आत्ता याच विधानामुळे अंकिता अडचणीत येऊ शकते. रियाने जर अंकिता लोखंडे विरोधात एफआयआर दाखल केली. तर तिच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते. त्यामूळे आत्ता सर्वांचे लक्ष रियाकडे आहे.
रियाच्या वकीलांच्या वक्तव्यामूळे देखील हा अंदाज वर्तवला जात आहे. ते म्हणाले होते की, ‘ज्यांनी टेलिव्हिजन आणि पत्रकारांसमोर रियाची बदनामी करून केसला फिरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.’
त्यांनी पुढे सांगितले की, ‘रिया सीबीआयकडे एक यादी देणार आहे. या यादीत ज्यांनी ज्यांनी रियाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांची नावे असणार आहेत. त्यासोबतच काही टिव्ही चॅनेल्सच्या नावांंचा देखील समावेश आहे’.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जुनला त्याच्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर अनेक वाद निर्माण झाले आहेत. बॉलीवूडची खरी काळी बाजू लोकांसमोर येत आहे. म्हणून अनेकजण भडकले आहेत.
सुशांतच्या मृत्यूनंतर लोकांनी रियावर अनेक आरोप केले आहेत. तर सुशांतच्या कुटूंबियांनी देखील रियाला सुशांतच्या मृत्यूसाठी जिम्मेदार ठरवले आहे. म्हणून हा वाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सुशांतच्या घरच्यांनी रियावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
त्यासोबतच सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये अनेक वाद निर्माण झाले आहेत. नेपोटिझमचा मुद्दा देखील खुप जास्त चर्चेत आहे. तर ड्रग्जचे प्रकरण देखील गाजत आहे. या सर्व प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून सुशांत सिंग राजपूतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप करण्यात आले आहे.
सोशल मीडीया आणि माध्यामांनी देखील रियाबद्दल अनेक अफवा पसरवल्या आहेत. अनेक माध्यामांनी रियावर आरोप करत तिला गुन्हेगार ठरवले आहे. पण आत्ता मात्र रियाच्या वकीलांनी रियावर खोटे आरोप करणाऱ्यांना चेतावणी दिली आहे.
रियाचे वकील सतीश मा रियाबद्दल खोट्या अफवा पसरवणाऱ्यांची एक यादी सीबीआयकडे देणार आहेत. त्या यादीत नाव असणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी रिया करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सहकाऱ्याच्या निधनाने जयंत पाटील भावूक; आठवणी जागवतानाच अश्रुंचा बांध फुटला
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांदी! भाव अजून वाढणार; ‘ही’ आहेत भाववाढी मागची कारणे
भारत घेणार २० जवानांच्या बलिदानाचा बदला, चीनला झटका देण्याची ‘अशी’ आहे योजना