कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी आता रिया चक्रवर्ती आली पुढे; म्हणाली, मला डायरेक्ट मेसेज करा

मुंबई । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना परिस्थिती बिघडत चालली आहे. अनेक रुग्णांना बेड, व्हेंटिलेटर मिळत नाहीत, तसेच ऑक्सिजनची देखील मोठी कमतरता भासू लागली आहे. रेमडेसिवीरचे इंजेक्शन देखील मिळत नाहीत.

या पार्श्वभूमीवर अनेक लोक या गोष्टी उपलब्ध करुन मदतीचा हात पुढे करत आहेत. यामध्ये आता अभिनेत्री रिया चक्रवर्तीने देखील ट्विट करत मदतीचा हात पुढे केला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रियाने मदत करण्याची इच्छा व्यक्त केली.

ट्विट करत ती म्हणाली, कठीण काळात एकत्र येण्याची गरज आहे. तुम्हाला शक्य त्यांना मदत करा, छोटी मदत किंवा मोठी मदत. मदत ही मदत असते. मी जर कुणाची मदत करू शकत असेल तर मला डायरेक्ट मेजेस करा. मी शक्य ते करेन, असे तिने म्हटले आहे.

गेल्यावर्षी अभिनेता सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येमुळे रिया चक्रवर्ती चर्चेत आली होती. याप्रकरणी तिला अटक देखील करण्यात आली होती. सुशांतच्या वडिलांनी रियावर गंभीर आरोप केले होते.

तपासात ड्रग प्रकरण समोर आल्याने एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली आहे. हे प्रकरण देशात चांगलेच गाजले होते. यावरून वर्षभर गोंधळ सुरू होता, अनेक मोठ्या कलाकारांची देखील याप्रकरणी चौकशी केली आहे.

ताज्या बातम्या

मोदींमुळेच कोरोनाचा भडका, हिंदू नाराज होऊ नये म्हणुन कुंभमेळा होऊ दिला, बंगालमध्ये रॅली काढल्या

महाराष्ट्राच्या मदतीला धावला ‘या’ राज्याचा मुख्यमंत्री; राज्याला दिले ३०० व्हेंटीलेटर्स

सुजय विखेंची धाडसी मोहीम; नगरसाठी १० हजार रेमडिसीवीर स्वत: खाजगी विमानाने आणल्या

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.