‘त्या’ लज्जास्पद व्हिडिओमुळे रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. दरम्यान, सत्य बाहेर आणण्यासाठी आता न्यायालयाने या प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला आहे.

दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत ५६ जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांतचे कुटुंबीय, त्याचा मित्र परिवार, त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांचा समावेश आहे.

सध्या सोशल मीडियावर रिया चक्रवर्ती आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तो व्हीडिओ पाहून नेटकरी प्रचंड संतापले आहेत. त्यामुळे रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.

त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रिया मीडियाशी बोलताना दिसत आहे. त्यावेळी रियाने महेश भट यांचा हात घट्ट धरलेला आहे. एवढेच नाही तर ती मीडियाशी बोलत असताना महेश भट तिच्या खांद्यावर डोक ठेऊन उभे राहिल्याचे दिसते.

या व्हायरल व्हिडिओमधील हे दृश्य पाहून सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे संताप व्यक्त केला आहे. व्हायरल झालेल्या त्या व्हीडिओमुळे रिया आणि महेश भट यांच्यावर खूप टीका केली जात आहे.

असे सांगण्यात येत आहे की, हा व्हीडिओ जलेबी चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी काढण्यात आला आहे. त्या व्हीडिओमध्ये रिया चक्रवर्ती, महेश भट आणि अभिनेता वरुण मेहता दिसत आहेत.

या व्हीडिओमधील महेश भट्ट आणि रियाने केलेल्या कृत्यामुळे नेटकरी चांगलेच संतापले आहेत. त्यामुळे महेश भट्ट आणि रिया चक्रवर्तीला पुन्हा एकदा ट्रोलींगचा सामना करावा लागणार आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.