ज्याने पुण्य केले आहे तोच ‘ही’ नदी पार करू शकतो, गरूडपूराणातसुद्धा तिचा उल्लेख आहे

लहानपणापासून आपल्याला तुम्ही स्वर्ग आणि नरक हे दोन शब्द ऐकले असतील. पण जेवढे स्वर्गाबद्दल कुतूहल नसते तेवढे लोकांना नरकाबद्दल कुतूहल असते. कारण असे म्हणतात की, नरकात उकळते तेल, तलवारी, रक्ताच्या नद्या, धारधार अस्त्रे, काळोख, तप्त वातावरण, छळ करणारे राक्षस अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील.

आपण कोणते पाप केले की आपण नरकात जाऊ अशी भिती आपल्याला वाटते. त्यातील काहीजणांना वाटते की या सर्व अफवा आहेत. परंतु पुराणात याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. यामध्ये सांगितले आहे की नरकातून स्वर्गाकडे जाण्याच्या मार्गाबद्दलही लिहीले आहे.

गरूड पूराणात भगवान श्रीकृष्ण यांनी स्वर्ग आणि नरक याबद्दल गरूडाला माहिती सांगितली आहे. त्यांनी सांगितले की वैतरणी नावाची एक महान नदी यमराजाच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. ही नदी खुप भयानक आहे. हिचा विस्तार नऊ हजार योजने इतका जास्त आहे.

सर्वात मोठी हीच नदी आहे. या नदीतुन अत्यंत दुर्गंधी बाहेर पडते आणि हिला पार करणे खुप अवघड आहे. किडेमुग्यांनी ही नदी भरलेली असते. पापी लोक त्यामध्ये सारखे पडत असतात व गोँधळ घालत असतात.

या महानदीमध्ये चार प्रकारचे प्राणी असतात. दान कर्माचे पुण्य केलेल्या जीवालाच ती नदी पार करणे सोपे असते. कृतघ्न, विश्वासघाती लोक दीर्घकाळपर्यंत तिथेच अडकून पडतात. जिवितपणी दान देणाऱ्या आणि श्रद्धाभाव असलेल्या जीवांचे दान दिर्घकाळापर्यंत राहते.

पण शरीरसंपत्ती अस्थिर असते. मृत्यु नित्य असतो म्हणून धर्माचा संचय अवश्य करावा. वेळोवेळी योग्य हाती त्याचा विनियोग करून आणि दान करून वैतरणी पार करण्यासाठी पुण्यसंचय करावा. भगवतांची प्रार्थना करावी आणि मृत्युनंतर ही महाभयंकर नदी पार करण्यासाठी शक्य तेवढे पुण्य साठवण्याचा प्रयत्न करावा.

ते पुण्य मृत्युनंतर कामी येते. जन्मरणाच्या फेऱ्यातून आणि तथाकथित नरकातून सुटका होत मोक्षाचा मार्ग मोकळा व्हावा. जो माणूस दान, धर्म यांपासून दूर राहतो किंवा दानधर्म करत नाही त्याचे जीवन या भूमंडावर दरिद्रीच राहते.

शरीर नाशवंत आहे ते कधीना कधी नष्ट होणार आहे. म्हणून नेहमी पुण्य करावे. प्राण हा एखाद्या पाहुण्यासारख्या आहे, तो कधी निघून जाईल काहीही सांगता येत नाही. म्हणुन मेल्यानंतर काय होईल याचा विचार करण्यापेक्षा जिवंतपणी काय चांगले काम करता येईल याचा विचार करा.

या गोष्टींमुळे तुमचा मृत्युनंतरचा मार्ग आपोआप मोकळा होईल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कळवा. जर ही माहिती आवडली असेल तर पुढे पाठवायला विसरू नका आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या फेसबूक पेजला भेट द्या.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.