सुशांत प्रकरणात आता रितेश देशमुखची उडी; रियाला दिला उघड पाठिंबा देत म्हणाला..

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग अँगलसमोर आल्यानंतर एनसीबीने ६ सप्टेंबरला रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबरला रियाची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. बाहेर आल्यानंतर रियाने तिच्या विरोधात खोट्या अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

या यादीत सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे रियाची शेजारीण डिंपल थवानीचे. डिंपलने दावा केला होता की, सुशांतच्या आत्महत्येच्या एक दिवस अगोदर म्हणजे १३ जुनला सुशांत रियाला सोडायला आला होता. पण एनसीबीच्या चौकशीत डिंपल आपल्या दाव्यावरून पलटली.

बाहेर आल्यानंतर रियाने खोटा दावा करणाऱ्या डिंपल विरोधात तक्रार दाखल केली आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर रियाबद्दल खुप काही बोलण्यात आले. मीडिया आणि लोकांनी रियावर अनेक आरोप केले आहेत.

या सर्व प्रकरणावर अभिनेता रितेश देशमुखने आपले मत व्यक्त केले आहे. त्याने रियाला पाठिंबा देत ट्विट केले की, ‘रिया चक्रवर्ती तुला लढण्यासाठी ताकद मिळो. सत्यापेक्षा ताकदवाण कोणीच नाही’. या अगोदर देखील बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी रिया चक्रवर्तीला या प्रकरणात सपोर्ट केला आहे.

रिया चक्रवर्तीला जामीन मिळाल्यानंतर अनेक बॉलीवूड कलाकारांनी रियाला पाठिंबा दिला होता. रियाने आत्तापर्यंत या प्रकरणात बॉलीवूडमधील अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. दिपीका पादुकोण, सारा अली खान आणि रकूल प्रीत सिंग या कलाकारांची चौकशी करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

भाजपला खिंडार! एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित

झोपेत घोरण्याची सवय आहे धोकादायक, ‘या’ आजारांना देताय तुम्ही निमंत्रण

कारगिल युद्धात जीवाची बाजी लावत जवानांचे प्राण वाचवणारी रणरागिनी; वाचा थरारक किस्सा

तुम्हाला माहितीये का तोंडात विरघळणारा कबाब कसा बनवतात, जाणून घ्या रेसिपी

मोदी सरकारने आणले पशू आधार कार्ड! जाणून घ्या कसा फायदा होणार शेतकऱ्यांना

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.