बॉलिवूड मधील एक आदर्श कपल म्हणून ज्या जोडीकडे बघितले जाते ती म्हणजे रितेश आणि जेनेलिया. सध्या त्यांच्या वेड हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ते दोघेही चर्चेचा विषय बनले आहे.
जेनेलियाच्या हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. रितेश आणि जेनेलियाच्या या चित्रपटाने महाराष्ट्राला वेड लावले आहे. हा चित्रपट प्रदिर्शित होताच दुसऱ्याच दिवशी चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे.
प्रमोशन दरम्यान रितेश आणि जेनेलिया त्यांच्या खासगी आयुष्याबद्दलही बोलतांना दिसत आहे. रितेश आणि जेनेलिया यांना दोन मुलं आहेत, रियान आणि राहील. रितेशने एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याबद्दल केले. जेव्हा रितेशला विचारण्यात आले की, आपल्या मुलांवर चित्रपटांचा काय परिणाम होतो याचा विचार तुम्ही करता का?
या प्रश्नाचे उत्तर देतांना रितेश म्हणाला,“ चित्रपटामधील माझा लूक पाहून माझ्या मुलांनी मला विचारलं की तुमच्या तोंडामध्ये काय आहे. सिगरेट म्हणजे काय? असंही विचारलं. आम्ही लोकांच्या तोंडामध्ये हे पाहिलं आहे अशी माझी मुलं मला म्हणाली. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. आपण हे काही करत नाही. शिवाय आम्ही दोघंही सिगरेट व दारू पीत नाही.”
रितेशने दिलेल्या या उत्तरावरून स्पष्ट होते की, रितेश आणि जेनेलिया आपल्या मुलांनी विचारलेल्या प्रश्नांना खऱ्या पद्धतीने उत्तरं देत असतात. तसेच ते दोघेही निर्व्यसनी आहेत हे या उत्तरामधून स्पष्ट होते. आणि सद्याच्या काळात ही खूपच कौतूकाची गोष्ट आहे असे म्हणावे लागेल.
असाच एक किस्सा त्याने वेड चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान सांगितला होता. पापाराझी समोर दोन्ही मुलं हात का जोडतात? यावर रितेश म्हणाला की, “तुमचे आई बाबा जे काम करतात त्यासाठी त्यांचे फोटो काढले जातात आणि तुम्ही आमची मुलं आहात म्हणून तुमचे देखील फोटो काढले जातात.
परंतु तुमचे फोटो काढावे असे तुम्ही काहीच केलेले नाही म्हणून तुम्ही हात जोडून त्यांचे आभार मानायला हवे.” रितेश आणि जेनेलियाचे आपल्या मुलांना ज्या पद्धतीची शिकवण देत आहे ते प्रशंसनीय आहे. लोक याचे खूपच कौतूक करत आहेत.
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा या जोडीचा मराठी चित्रपट वेड सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ते दोघेही चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतांना दिसत आहेत. अशातच प्रमोशन दरम्यान त्यांनी काही कौंटुंबिक किस्सेही उलगडले आहेत. सणउत्सवाच्या निमित्ताने रितेश मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतोच.
अनेकदा त्यांची मुलं पापाराझी फोटोग्राफर्स समोर हात जोडून नमस्कार करतांना दिसतात. जेव्हाही त्यांचे फोटो काढले जातात तेव्हा ते हात जोडून नमस्कार करतात आणि फोटोग्राफर्सला थँक यू असे म्हणतात. यामागचे कारण विचारता, रितेश ने दिलेल्या उत्तरामुळे सगळ्यांची मने जिंकली आहेत.
महत्वाच्या बातम्या
कॅमेरा दिसताच तुझी मुले हात का जोडतात? रितेशच्या उत्तराने जिंकली सगळ्यांची मने
रितेश-जेनेलियाच्या वेड चित्रपटाला लोकांची तुफान गर्दी, पहिल्याच दिवशी केली बक्कळ कमाई
Ved : रितेश-जेनेलियाच्या वेडने लोकांना लावलं वेड, पहिल्याच दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला