राखी सावंत आणि तिचा माजी पती रितेश यांच्यात निर्माण झालेला नवा वाद आता कोर्टात पोहोचू शकतो, असं दिसतंय. रितेशने राखी सावंतवर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली आहे. राखी सावंतने नुकतेच रितेशवर तिचे फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेल अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला आहे.(Rakhi Sawant, Riteish, Facebook, Instagram, legal action)
राखीने सांगितले होते की रितेश तिला उद्ध्वस्त करण्याची धमकी देत आहे आणि तिचे सर्व सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत. याप्रकरणी राखी सावंत ओशिवरा पोलीस ठाण्यातही गेली होती. ती खूप रडत होती. रितेशने आता राखी सावंतच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
राखी सावंतने केलेल्या आरोपांबाबत रितेशला विचारले असता तो म्हणाला, ‘मी तिच्या आरोपांना कायदेशीर मार्गाने उत्तर देईन. परिस्थिती अगदी स्पष्ट आहे. मी तिच्यावर करोडो रुपये उधळत होतो. त्यावेळी राखीला ते पैसे घेण्यास कोणतीही अडचण नव्हती. मी तिच्यावर पैसे खर्च करणे बंद केल्यावर तिने माझ्यावर असे आरोप करायला सुरुवात केली.
तुम्ही कधी इंस्टाग्राम पोस्टवर नाते संपल्याचे ऐकले किंवा पाहिले आहे का? भविष्यात ती माझ्यावर आणखी आरोप करू शकते. रितेश पुढे म्हणाला, ‘राखी सांगू शकते की ती आणि आदिल बिग बॉसच्या घरात जाणार आहेत. हे सर्व नाटक फक्त तीच करू शकते. राखीपासून दूर राहून मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे.
राखीमुळे मला झालेल्या भावनिक वेदनांपासून मी दूर आहे. गेली तीन वर्षे ती माझा वापर करत आहे. तिच्याकडे ना गाडी होती ना घरात इतर काही. राखीच्या घरात ज्या काही वस्तू आहेत, त्या सर्व मी खरेदी करून दिल्या आहेत. ती इतकी निर्लज्ज आहे की दुसर्या माणसाला बेकायदेशीरपणे घरात ठेवले आहे आणि मी विकत घेतलेल्या आणि दिलेल्या वस्तू वापरत आहे.’
रितेशने पुढे सांगितले की, त्याची पत्नी स्निग्धानेही त्याच्यासोबत असेच केले. राखीनेही हेच डावपेच अवलंबले आहेत. रितेश म्हणाला, “दोन्ही महिला (राखी आणि स्निग्धा) त्या पुरुषांसोबत राहत आहेत ज्या पुरुषासोबत त्यांना राहायचे होते. स्निग्धा दिल्लीत तर राखी मुंबईत राहते. दोघांनी मला लुटले.
राखीने माझे शोषण केले. आता मी कायदेशीर कारवाई करेन आणि ४९८अ विरोधात जनहित याचिकाही दाखल करणार आहे. रितेश जेव्हा राखी सावंतसोबत ‘बिग बॉस’च्या घरात होता तेव्हा त्याची पहिली पत्नी स्निग्धा सार्वजनिकपणे समोर आली होती आणि मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रितेशवर खळबळजनक आरोप केले होते. त्याचवेळी रितेश आधीच विवाहित असून तो एका मुलाचा बाप असल्याची चर्चा होती.
महत्त्वाच्या बातम्या
बिचवरच रंगला विराट अनुष्काचा खेळ! पहा दोघांचे रोमॅंटीक फोटो..
‘तुम्ही सिनेमागृहात आलात का?’ हायकोर्टाच्या न्यायमूर्तींनी ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्याला फटकारले; व्हिडिओ झाला व्हायरल
पुन्हा सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीने भावूक झाली क्रिती सेनन म्हणाली, मला आनंद आहे की…