‘वाथी कमिंग’ गाण्यावर जखमी जेनेलियाचा भन्नाट डान्स, रितेशसह मित्रांचा धिंगाना; पहा व्हिडीओ

मुंबई | बॉलिवूडचं क्यूट कपल असलेली मराठमोळी जोडी रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनलिया देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. नुकताच त्यांनी साऊथचा सुपरस्टार विजय थलापतीच्या ‘वाथी कमिंग’ गाण्यावर राऊडी डान्स केला आहे. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

व्हिडीओत विशेष बाब म्हणजे जेनेलिया जखमी आहे. अशा परिस्थितीत तिने भन्नाट डान्स केला आहे. तिच्यासोबत रितेश देशमुख, शब्बीर अहलुवालिया, आशिष चौधरी, कांची कौल आणि जेनिफर विगेट हे देखील डान्स करताना पाहायाला मिळत आहेत.

विजयच्या ‘वाथी कमिंग’ या गाण्याचा सध्या सोशल मीडियावर ट्रेंड सुरू आहे. ‘वाथी कमिंग’ हे गाणे त्याच्या मास्टर या चित्रपटातील आहे. या गाण्याला १ महिन्यातच ८७ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. गाण्याला १ वर्षात १२३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.

दरम्यान, जेनेलिया स्केटिंगचा सराव करताना तोल जाऊन पडल्याने जखमी झाली. यापुर्वी याबाबतचा व्हिडीओ पावरी स्टाईलने तिने शेअर केला होता. स्केटिंग करताना पडलेल्या जेनेलियाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जेनेलियाने यापुर्वी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्नड आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.

महत्वाच्या बातम्या-
आता खरी विकेट पडली! जसप्रित अडकला लग्नबेडीत, पहा लग्नाचे खास व्हायरल फोटो
करिश्मा कपूर नाही तर ‘ही’ अभिनेत्री आहे अक्षय खन्नाचे पहीले प्रेम; नाव वाचून धक्का बसेल
स्केटिंग करताना जेनेलिया आपटली, तरीही शेअर केला भन्नाट ‘पावरी’ स्टाइल व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.