रितेश देशमुख आणि जिम ट्रेनरमध्ये मारहाण; हात जोडून रितेश देशमुखने मागितली माफी, म्हणाला…

सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हा चर्चेचा विषय असतो. रितेश देशमुख हा सध्या बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीचा महत्वाचा चेहरा आहे. रितेश देशमुख हा सध्या त्याच्या व्हिडिओंमुळे चांगलाच चर्चेत असतो.

सध्या रितेश देशमुख हा सोशल मीडियावर खुप ऍक्टीव्ह आहे. तो सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ पोस्ट करताना दिसत असतो. आताही त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओ तो त्याच्या जिम ट्रेनरसोबत भांडण करताना दिसून येत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख जिम ट्रेनरसमोर हात जोडताना दिसून येत आहे. रितेशचा हा व्हिडिओ चाहतेच नाही, तर सेलिब्रीटीपण हैराण आहे. सध्या रितेशचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चाचा विषय ठरत आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो जिम ट्रेनरसमोर हात जोडत आहे. तो घरी जाण्यासाठी विनंती करत आहे. व्हिडिओमध्ये दिसून येते की रितेश देशमुख व्यायाम करतोय, त्यामुळे त्याला वेदना होत आहे.

तसेच त्यानंतर रितेश देशमुख म्हणतो मला जाऊद्या घरी, माझी आई माझी वाट बघत आहे, तर त्याचा ट्रेनर म्हणतो तुला लवकरच सोडण्यात येईल. खरं तर हा डायलॉग अजय देवगणच्या दिलवाले या चित्रपटातला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

रितेश देशमुख लवकरच चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश हा बच्चन पांडे या चित्रपटात दिसून येणार आहे. तसेच रितेश देशमुखचा ककुदा हा मराठी चित्रपटही येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-
“शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याची नार्को टेस्ट करा, त्यातून फक्त एकच गोष्ट समोर येईल ती म्हणजे…”

आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदला नेटकऱ्यांनी धुतले, #Scamsood ट्रेंडींग
‘सध्याची ईडीची अवस्था रस्त्यावर चलन कटणाऱ्याप्रमाणे’, सुप्रिया सुळे यांचा खोचक टोला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.