देवा, घड्याळाचे काटे पुन्हा उलटे फिरव; वडिलांच्या आठवणीत रितेश देशमुख भावूक

राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते दिवंगत विलासराव देशमुख यांची आज ७६ वी जयंती आहे. विलासराव देशमुखांच्या जयंतीनिमित्त राजकीय नेत्यांनी अभिवादन केले आहे. विलासराव देशमुखांचे चिरंजीव  रितेश देशमुख आणि सुन जेनेलिया देशमुख यांनीही सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे.

रितेश आणि जेनेलिया सोशल मिडियावर चांगलेच सक्रीय असतात. रितेश देशमुख नेहमीच वडिलांच्या आठवणींना उजाळा देत असतो. वडिलांच्या जयंतीनिमित्त रितेशने वडिलांसोबतचा लहानपणीचा फोटो शेअर केला आहे.

रितेश फोटो शेअर करत म्हणाला, देवा घड्याळाचे काटे कृपया पुन्हा उलटे फिरव. तुमची रोज आठवण येते पप्पा. वाढदिवसाच्या शुभेच्छा. असं रितेशने म्हटलं आहे. विलासराव देशमुखांची सुन रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री जेनेलियानेही भावनिक पोस्ट लिहिली आहे.

विलासराव देशमुखांना मिठी मारतानाचा एक फोटो शेअर करत जेनेलिया म्हणाली, वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा. आम्ही तुमची आठवण काढतो. बापलेकीची मिठी जी निरंतन राहिल. असं जेनेलियाने म्हटलं आहे.

विलासराव देशमुखांचा राजकारणात चांगला दबदबा होता. लातूर जिल्ह्यातील बाभळगाव या मुळगावापासून विलासराव देशमुखांची राजकीय कारकिर्द सुरू झाली होती. विलासराव देशमुखांच्या निधनानंतर राज्याला मोठा धक्का बसला होता.

मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अशा अनेक महत्वाच्या पदांवर काम करून त्यांनी  नावलौकिक मिळवले होते. किडनी व यकृत निकामी झाल्याने चेन्नई येथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले होते.

विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोघेही राजकारणात सक्रीय आहेत. वडिलांच्या निधनानंतर दोघांनी समाजसेवेचा वसा पुढे चालू ठेवला आहे. अमित देशमुख राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री आहेत.

महत्वाच्या बातम्या-
सूर्यासारखा कायम तेजस्वी व आकर्षक दिसेल चेहरा, फक्त सकाळी उठून करा ‘ही’ २ सोपी कामे!
‘मी मुल जन्माला घालणारी मशीन नाही’ ट्रोल करणाऱ्यांवर भडकली विद्या बालन
धक्कादायक! रुग्णवाहिकेने जास्त पैसे मागितले, बापाने सीटवर बांधून आणला मुलीचा मृतदेह

 

 

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.