किती ते प्रेम! जेनेलियाने चावला रितेशचा कान, म्हणते प्रेमात पुर्णपणे वेडी झाली आहे; पाहा व्हिडीओ

अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसूजा दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. याद्वारे ते नेहमी कुटुंबीयांसोबतचे, मित्रांसोबतचे तसेच वैयक्तिक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करतात. यावेळी दोघांच्या आणखी एका व्हिडीओला चाहत्यांचे विशेष प्रेम मिळले आहे. हा व्हिडीओ जेनेलियाने त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा यांच्या लग्नाचा वाढदिवस आज(बुधवार) आहे. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर कपलपैकी एक असलेल्या रितेश आणि जेनेलियाच्या लग्नाला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जेनेलियाने एक मस्त व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जेनेलिया रितेशवर प्रेम करताना दिसत आहे.

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जेनेलिया हिने आपला नवरा रितेश याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये ती रितेशसोबत दिसत आहे. या व्हिडिओला पाहून खात्री होईल की जेनेलिया रितेश यांच्यामध्ये किती प्रेम आहे. तो आणि ती एकमेकांसाठी किती वेडे आहेत. ते या व्हिडीओतील दोघांची केमिस्ट्री पहाता लक्षात येते.

प्रेम आपल्याला कधीच सापडत नाही. ते आपल्याला स्वत:हून शोधून काढतं. हे सर्व नशिबानं मिळतं. तुझ्यासोबत आयुष्यात प्रत्येक गोष्ट करायची आहे. जी आपल्यासाठी स्पेशल असेल. तुझ्याशिवाय मी काहीच नाही. मी तुझ्या प्रेमात पूर्णपणे वेडी झाले आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं कॅप्शन जेनलियाने व्हिडीओ पोस्ट करताना दिले आहे.

जेनेलियाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती रितेशचा किस करताना दिसत आहे. तर कधी कानाचा चावा घेताना पाहायला मिळत आहे. दोघांमधील प्रेम पाहून चाहते व्हिडीओवर व्यक्त होत आहेत. दोघांमधील प्रेम पाहून त्यावर कमेंट करत आहेत.

दरम्यान, पाठीमागच्या लग्नाच्या वाढदिवासा निमित्ताने रितेशने एका भन्नाट व्हिडीओ शेअर केला होता. रितेश आणि जेनेलिया पहिल्यांदा तुझे मेरी कसम या चित्रपटाच्या सेटवर २००२ मध्ये भेटले. तेव्हाच ते ऐकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु दोघांनी लग्नाचा निर्णय घेण्यासाठी घाई केली नाही. बरेच दिवस एकमेकांना डेट केल्यानंतर जेनेलिया आणि रितेशने २०१२ मध्ये लग्न केले.

महत्वाच्या बातम्या-
सौंदर्यामध्ये सगळ्या अभिनेत्रींना तोड देते तेरे नाममध्ये भिकारी दिसणारी ही अभिनेत्री, पहा फोटो
 तुला कापू का? कोंबडी म्हणते नको-नको, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा झाला; फोटो पाहून म्हणाल, काय दिसतेय अप्सरा…
जेव्हा राज ठाकरेंनी निलेश साबळेला १०-१२ वेळा फोन केला, तरी फोन नाही उचलला अन् जेव्हा फोन उचलला तेव्हा…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.